Skip to main content
मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)

मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)

By Vatvatkaar
वेगवेगळ्या विषयांची, वेगवेगळ्या मतांची सरमिसळ आणि दिलखुलास चर्चा.
मराठी पॉडकास्ट | Marathi Podcast

वटवटकार: सागर, पराग आणि रोहित
लोगो: राजेश गोडे

#मेतकूट #मराठी #पॉडकास्ट
#म #गप्पा #पॉडकास्ट #marathi
Where to listen
Apple Podcasts Logo

Apple Podcasts

Google Podcasts Logo

Google Podcasts

Pocket Casts Logo

Pocket Casts

RadioPublic Logo

RadioPublic

Spotify Logo

Spotify

S2.E11 - दुसऱ्या सत्राची सांगता... लवकरच पुन्हा भेटू
चला तर मग मेतकुटच्या दुसऱ्या सत्राची सांगता करण्याची वेळ आलेली आहे. गेल्या सत्राप्रमाणेच याही सत्रात साथ दिल्याबद्दल सर्वांचे खूप धन्यवाद. यावेळी आमच्याबरोबर आपापल्या क्षेत्रात पारंगत, आपापल्या विषयांवर प्रेम करणारी आमची काही मित्रमंडळी सुद्धा होती. त्यामुळे गप्पांचा आवाका (आणि हो... लांबी सुद्धा) जी वाढली त्याबद्दल सुद्धा त्यांचे आभार. या सत्रात नेहमीप्रमाणेच नवे विषय, त्याच्या नव्या बाजू, नवी पुस्तकं हे तर समजलंच पण नवे शब्द, नवे पदार्थ आणि अर्थ नियोजनाच्या क्लुप्त्या सुद्धा सापडल्या. आपण सगळे एकमेकांपेक्षा इतके वेगळे असूनही केवढे एकमेकांना जोडले गेलेलो आहोत, हे प्रकर्षाने जाणवलं.    आणि हाच दुवा मनात ठेवून तुम्हा सर्वांचा निरोप घेतो आहोत. लवकरच तिसरे सत्र घेऊन परत येऊ. तोपर्यंत दुवा में याद रखना. प्रतिक्रिया कळवत राहा. या गप्प्पा तुमच्या मित्र आणि परिवारापर्यंत पोचवत राहा. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter
41:20
March 27, 2022
S2.E10 - अर्थ नियोजनाची शर्थ - शैलेश आणि ऋजुता बरोबर गप्पा
आता बघा, असं आहे की, सगळी सोगं आणता येतात, पण पैश्याचं सोंग आणता येत नाही. मग कमाई आणि खर्च यांचा ताळमेळ करताना भविष्याच्या गरजांचा विचार पुरेसा होतो का? पैसा साठवणे आणि गुंतवणे यातला फरक काय? घराचा EMI, मुलांचं शिक्षण, मौजमजा यांत म्हातारपणात आर्थिक स्वावलंबन कसं नियोजन असावं? त्यात पुन्हा “महंगाई डायन खाये जात है”. या जंजाळात पद्धतशीर लॅनिंग कसं करावं याबद्दल गप्पा मारायला आर्थिक सल्लागार शैलेश गद्रे आणि ऋजुता बापट-काणे आपल्यासोबत मेतकूट पाॅडकास्टच्या या भागात आलेले आहेत. या भागात आलेले संदर्भ : One Idiot / Rule of 72 / 4% Rule / Harsh Realities / Your Next Five Moves ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter शैलेश, ऋजुता आणि त्यांच्या टीम सोबत संपर्क साधण्यासाठी,  Whatsapp or call +91 99308 47334 | support@gkfsindia.com । GKFS Facebook | GKFS LinkedIn  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 00:00:00 नमस्कार चमत्कार  00:08:35 पॅशन हेच करियर करण्याचं धाडस करण्या आधीची तयारी   00:16:05 आयुष्यातल्या महत्वाच्या टप्प्यांसाठी कसं नियोजन कराल  00:24:18 करियरच्या सुरुवातीलाच पेन्शनचं नियोजन? काहीतरीच काय!  00:30:50 एकीकडे महागाई, आणि दुसरीकडे आपल्या वाढ(व)लेल्या गरजा - Personal Inflation  00:36:20 आर्थिक नियोजनात स्त्रिया पुढे आहेत कि मागे?  00:42:38 बचत आणि गुंतवणूक यातला फरक   00:47:50 लहानपणापासूनच मुलांमध्ये financial literacy कशी रुजवावी?   00:59:22 भविष्यातल्या महागाईचा फटका बसू नये म्हणून नियोजन कसे असावे ?  01:09:32 गुंतवणूक करतांना होणाऱ्या सामान्य चुका  01:13:20  एकाच ठिकाणी सगळे पैसे गुंतवू नका (Portfolio diversification)  01:27:13  Life enjoy करता आलं पाहिजे  01:29:50 Financial goals - emergency fund, short / medium / long term vision  01:32:00  पैसे खर्च करताय कि वाया घालवताय?  01:44:40  सध्या काय वाचताय, पाहताय, लिहिताय?    
01:53:38
March 20, 2022
S2.E9 - जय जय मनी!
देशाची जशी अर्थव्यवस्था असते, तशी आपापली छोटेखानी अर्थव्यवस्था पण असू शकते. कुठं खर्च करायचाय, कुठं नाही, कशासाठी तजवीज करून ठेवायची आहे, आपल्यालावर कोण अवलंबून आहेत, काही अचानक खर्च घडले तर काय? अशा प्रश्नांची एके काळी भीती जरी वाटली असली, तरी थोड्या फार प्रमाणात याचा आभ्यास केला तर याचे फायदे लगेच कळतात. अशाच या Financial literacy बद्दल आज थोडंसं. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter
51:49
March 13, 2022
S2.E8 - फ्रॉड अणि फसवणूक... रिश्ता वही, सोच नई
जमाना बदल गया, लोग बदल गए, नव्या तंत्रज्ञानाबरोबर, नव्या प्रकारच्या चोऱ्यामाऱ्या सुद्धा सुरु झाल्या. पूर्वी घरफोडी व्हायची तशी सध्या क्रिप्टो चोरी होऊ शकते. म्हणजे चोर सुद्धा वर्क फ्रॉम होम करू शकतात. अशाच प्रकारच्या काही नव्या जुन्या फ्रॉड आणि फसवणुकींबद्दलची चर्चा करत करत आज आम्ही ऍमेझॉन कुपन्स पासून ते बँक ऑफ इंग्लंड आणि बिट कॉईन करत करत आपल्या स्वदेश NSE पर्यंत पोचलो.  तुम्हाला या बद्दल काय वाटतं? तुमच्या माहितीत असले काही किस्से असले तर तेही जरूर सांगा. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter
01:09:27
March 06, 2022
S2.E7 - Fourier Transform, Inventions and Passion
शाळा कॉलेजमध्ये धो धो शिकून पुढे कॉर्पोरेट कल्चर मध्ये घुसल्यानंतर धक्का बसल्यासारखं होतं का? कोणत्या गोष्टी बदलतात? कोणत्या गोष्टी आधीच माहिती असत्या तर बरं झालं असतं असं वाटतं? कधी हा विचार मनात येतो का की आपल्याकडे व्हाट्सऍप, फेसबुक किंवा इतरही नवे शोध का बरं लागले नसतील? नासामध्ये बसून उपग्रह सोडणं महत्त्वाचं की एखाद्या गावात लाईट बल्ब लावणं महत्वाचं अशा स्वरूपाचा प्रश्न पडून तुमचा मोहन भार्गव होतो का? अशाच काही प्रश्नांची उजळणी, आणि काही उत्तरांची नव्याने ओळख असा आजचा भाग घेऊन आम्ही आलेलो आहोत. हे चर्चा सत्र अजून लांबेल असं दिसतंय. तेव्हा पुढचा भाग घेऊन लवकरच परत येऊ. आणि तेव्हा तुमच्यापैकी कोणाला आपलं मत मांडायचं असेल, तुमचा एखादा वेगळा मुद्दा असेल, तर जरूर सांगा. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter
01:28:12
February 27, 2022
S2.E6 - आज खानेमें क्या है? - प्रीती आणि राजेश सोबत गप्पा
अन्न हे पूर्णब्रह्म, असं ऐकत आपण सगळे मोठे झालो. पण या देवासमान अन्नामध्ये दडलेल्या तेहेतीस कोटी छटा यांची ओळख कधी बरं झाली? भारताबाहेर पडल्यावर, भारतीय जेवण म्हणजे पंजाबी जेवण अशा ओळखींमधून बाहेर येता येता आपण दक्षिण भारतीय जेवणाच्या वळणाला लागून आत्ता कुठं थोडं फार मराठमोळ्या पक्वांनांपर्यंत व्याख्या रुंदावू शकलोय. पण याच्याही पलीकडे आपण जे खातो, जसे खातो, त्याचा इतिहास, त्याचा लहेजा, त्यामागच्या रूढी आणि परंपंरा उलगडून दाखवणारा, त्याची माहिती जाणून घ्यायला उत्सुक करवणारा उपक्रम राबवणारी व्यक्ती म्हणून प्रीती आणि राजेश देव यांची ओळख. त्यांच्या याच उपक्रमाबद्दलची अधिक माहिती, त्यामागची प्रेरणा आणि त्यांना आलेले अनुभव जाणून घेणे हा यंदाच्या एपिसोडचा उद्देश.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter या भागात आलेले संदर्भ:  Two Hands UK / My UK Kitchen  रुचिरा / Julie & Julia / नल पाकदर्पण / भोजनकुतूहलम / सूपशास्त्र / Paat Paani दीन मोहम्मद शेख / आजीबाई बनारसे / वेणूताई चितळे   मनोज वसईकर / पूर्णब्रम्ह (जयंती कठाळे) / Chef's Table Shank's (film) / भारतीय पाककृतींची अन्नयात्रा Ethopian Cuisine in Spitalfields Market / झोमॅटो-स्विगी ची चलती 
02:06:23
February 20, 2022
S2.E5 - वाचाल तर वाचाल - विनायक रानडे यांच्यासोबत गप्पा
आपण 'ऑनलाईन' जगात नेहेमी 'कनेक्टेड' राहतो असं आपल्याला वाटतं. पण आपल्या जवळच्या माणसांच्या वाढदिवसाची आठवण करून देण्यासाठी, "हे पुस्तक/विडिओ/ सिनेमा/गाणे  तुला आवडू शकेल' असं सांगण्यासाठी आणि अगदी घरपोच आणून देण्यासाठी सुद्धा आपण चेहरा नसलेल्या एका मोठ्या तांत्रिक व्यवस्थेवर अवलंबून असतो. त्याचे फायदे आपल्या सगळ्यांना माहिती आहेतच.   पण या गोष्टी ऑफलाईन करणारा एक माणूस याच जगात आणि याच काळात वावरतोय यावर तुमचा विश्वास बसेल?   तुम्ही विचाराल कोण आहे हा माणूस ?आणि मुख्य म्हणजे का करतो हे असं काही?   हा माणूस म्हणजे "ग्रंथ तुमच्या दारी" ही चळवळ उभी करणारे आणि पुस्तकांना लोकांपर्यंत घेऊन जाणारे पुस्तक-वेडे व्यक्तिमत्व विनायक रानडे. मेतकूट च्या आजच्या भागातले पाहुणे.   आता दुसरा प्रश्न - पण का?  "पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचावी" या पेक्षाही मोठे, महत्वाचे आणि मनाला समाधान देणारे काहीतरी आहे हे विनायक रानडे यांच्याशी बोलताना सतत जाणवते. ते काय आहे हे समजण्यासाठी मात्र तुम्हाला एपिसोड ऐकावं लागेल. आणि हो ते काय आहे असे वाटते ते पण आम्हाला जरूर कळवा. बघूया या निमित्ताने आपण 'कनेक्ट' होतोय का?   ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter "ग्रंथ तुमच्या दारी" यासंदर्भात विनायक रानडे यांच्याधी संपर्क साधण्यासाठी +91 9922225777 (फक्त बोलण्यासाठी) +91 9423972394 (फक्त व्हाट्सएपसाठी) (ग्रंथ तुमच्या दारी - लंडन मध्ये)
02:08:15
February 13, 2022
S2.E4 - बातम्यांच्या महापुरात ... आशिष दीक्षित बरोबर
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे प्रसारमाध्यमं. हा विषय इतका महत्वाचा असला तरी आपण या चौथ्या स्तंभाला किती गंभीरतेने घेतो? आपणच कशाला? पत्रकारितेमध्ये असलेले लोक याला किती गंभीरतेने घेतात? प्रेक्षकवर्गात बसून आपल्याला सर्वाना हे प्रश्न पडत असतीलच. पण खुद्द पत्रकार कोणी असेल तर त्यांचे प्रश्न काय असतील? त्यांचा प्रवास कसा असेल? त्यांना आलेले भलेबुरे अनुभव कुठले असतील?   भरमसाठ चॅनल, वृत्तपत्र आणि ऑनलाईन माध्यमांच्या गर्दीत BBC मराठी या डिजिटल ओन्ली प्लॅटफॉर्मने एक वेगळाच ठसा उमटवलाय. BBC मराठी च्या जडणघडणीत सिंहाचा वाटा उचलणारा त्या वाहिनीचा संपादक आशिष दीक्षित मेतकूट पॉडकास्ट वर गप्पा मारायला आलाय.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter या भागामध्ये आलेले संदर्भ:   १७७२ च्या लंडन गॅझेट मध्ये शिवाजी महाराजांची बातमी केसरी चा पहिला अंक आरण्यक  The Silent Sea  नझल  The Assassination Podcast  Cut the clutter आहे मनोहर तरी  मी अल्बर्ट एलिस:  मुकुल देविचंद यांचं बातम्या देणारं AI 
02:12:41
February 06, 2022
S2.E3 - व्हायरल नव्हे, व्हायटल - विनायक पाचलग बरोबर
तुम्ही जगाकडे कोणत्या खिडक्यांमधून पाहता?   काही सेकंदाचे, काही मिनिटांचे व्हायरल होणारे व्हिडीयो, शे-दोनशे अक्षरांतल्या प्रतिक्रिया, सतत माहितीचे विस्कळीत किंवा अनावश्यक असे तुकडे घेऊन घेणार्‍या ब्रेकिंग न्यूज आणि कमी कमी होत चाललेला आपला अटेन्शन स्पॅन... यात क्षणभर थांबून विचार करून, विश्लेषण करून या माहितीच्या तुकड्यांची सांगड घालून आजूबाजूचे जग समजावून घ्यायला जमतय का आपल्याला?   काहीही चटपटीत आणि बथ्थड गोष्टी “व्हायरल” करण्याच्या शर्यतीत भाग न घेता शांत आणि संयत “व्हायटल” (सकस) विश्लेषण करणारे “थिंकबॅंक” हे यूट्यूब वरचे एक दर्जेदार मराठी चॅनल. आजुबाजूस होत असलेल्या राजकिय, सामाजिक आणि आर्थिक स्थित्यांतरे याकडे सापेक्ष नजरेतून बघत आपल्या जगण्याशी थेट भिडणाऱ्या या डिजीटल चॅनलचा संपादक विनायक पाचलग मेतकूट पाॅडकास्ट वर गप्पा मारायला आज आपल्या सोबत आहे.  जाणून घेऊया त्याचा आणि थिंकबॅंकचा आजपर्यंतचा प्रवास.    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~  प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter Think Bank YouTube Channel,  या भागामध्ये आलेले संदर्भ,  1. https://www.goodreads.com/book/show/53452906-ten-lessons-for-a-post-pandemic-world  2. https://www.goodreads.com/book/show/54828853-deep-fakes-and-the-infocalypse 3. https://www.goodreads.com/book/show/55987594-jugalbandi 4. https://www.goodreads.com/book/show/60129018-raoparva 5. Amit Verma’s podcast https://seenunseen.in/ 6. Advertising is dead: https://shows.ivmpodcasts.com/show/advertising-is-dead-RxHPjV6WU3QJURnD 7. Filter Coffee: https://shows.ivmpodcasts.com/show/the-filter-koffee-podcast-REzRDso5YvWdg9XE 8. https://the-ken.com
44:44
January 30, 2022
S2.E2 - भाषेच्या नावानं चांगभलं
मातृभाषा हा खूप मजेशीर विषय आहे. शाळा होती तोपर्यंत भीती वाटायची आणि शाळा सोडल्यावर अभिमान वाटू लागला. मग आता "आपली" भाषा टिकावी, वाढावी, समृद्ध व्हावी या हट्टापायी भलेबुरे प्रयत्न आपण करतोच की. हे आत्ताच असं नाही. हे पूर्वापार चालत आलंय. पण भाषेच्या वृद्धीसाठी भाषेवर प्रेम परता आलं पाहिजे हेच खरं. मग ती स्वतःची असो, किंवा दुसऱ्याची. तुम्हाला काय वाटतं? शुद्ध-अशुद्ध भाषा, लिपी, व्याकरण, दुसर्‍या भाषेतून आलेले शब्द, भाषेतून वाहणारी संस्कृती, परंपरा, अस्मिता असा हा सगळा भाषेचा  नुसताच पसारा आहे की भाषेचे सौंदर्य वाढविणारा पिसारा आहे? एक विषय म्हणुन शाळेत शिकण्यात, नंतर भाषा टिकवण्यात आणि त्याच्या राजकारणात भाषेतील गम्मत समजायची राहून जाते का? आजच्या या भागामध्ये आम्ही या सगळ्यांमधल्या गंमतींवर गप्पा मारलेत. वेगवेगळ्या भाषेतील भन्नाट किस्से, आणि त्यातले बारकावे सांगायला आमच्यासोबत आहे अर्निका परांजपे.  अर्निकाची लेटेस्ट आणि आमच्या आवडीची ओळख म्हणजे तिचं "बांधणीच्या कविता" हे युट्युब चॅनेल. तिथे ती मराठी कवितांच्यातलं "मीटर" आणि ताल हे सगळं उलगडून सांगते. तिच्या चॅनेलला भेट दिला नसाल, तर आवर्जून द्या. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter या भागामध्ये आलेले संदर्भ: १. https://timesofindia.indiatimes.com/life-style/spotlight/different-languages-spoken-by-the-british-royal-family/photostory/80214184.cms?picid=80214200  २. रोमन लिपीत लिहिलेल्या बॉलिवूडच्या पटकथा  ३. https://en.wikipedia.org/wiki/Eliezer_Ben-Yehuda ४. हिब्रूचं पुनरुज्जीवन   ५. सफरचंद  ६. माधव ज्युलियन यांची छंदोरचना ७. सुनीता देशपांडेंचे कविता वाचन  भाग १, भाग २ ८. केवढे हे क्रौर्य ९. Why is Manike Mage Hithe so catchy?  १०. Iambic pentameter ११. रुडयार्ड किपलिंगची "If" कविता १२. https://www.theguardian.com/books/2020/sep/10/when-we-cease-to-understand-the-world-by-benjamin-labatut-review-the-dark-side-of-science १३. बहादूर अलास्त याचं युट्युब चॅनल : पोर्तुगीज आणि मराठीतली साम्य / संस्कृत आणि पर्शियन मधील साम्य
01:46:27
January 23, 2022
S2.E2 - Teaser (भाषेच्या नावानं चांगभलं)
भाषेच्या नावानं चांगभलं अनेकांसाठी भाषा हा केवळ शाळेत शिकायचा विषय राहून जातो. पण त्यातल्या अनेक गमती जमाती आणि जगभरात भाषेमुळे झालेल्या उलथापालथी आपल्याला माहीतच नसतात. अशाच भन्नाट गोष्टींविषयी मेतकूट मराठी पॉडकास्ट वर गप्पा मारायला येत आहे Arnika Paranjape, जी भारतीय भाषाच नाही तर इंग्रजी, ग्रीक आणि पर्शियन भाषा सुद्धा अंगाखांद्यावर लीलया खेळवते. पूर्ण एपिसोड लवकरच युट्युब आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट ॲपवर येत आहे. पटकन सब्सक्राईब करा म्हणजे पुढचा भाग मिस नाही होणार (आता हे वाक्य शुद्ध मराठीत म्हणून दाखवा) युट्यूब  किंवा https://anchor.fm/metkoot वर आपल्या आवडत्या पॉडकास्ट ॲपची लिंक सापडेल (spotify, apple podcast, google podcast)
00:34
January 22, 2022
S2.E1 - शिक्षणाची वाट शोधताना - केतन देशपांडे सोबत गप्पा
रस्ता लांबचा आहे. पुस्तकी शिक्षणापासून ते कौशल्य आधारित शिक्षणापर्यंतचा आहे. शिक्षणापासून नोकरीपर्यंतचा आहे. कुठे आर्थिक प्रगतीचा आहे तर कुठे जगण्याच्या संघर्षाचा आहे. माहितीचा महापूर किंवा दुष्काळ यापासून योग्य ती माहितीचा असण्याचा आहे. या रस्त्यावर ठेच खाल्लेल्या पण त्यानंतर दुसऱ्यांना शहाणे करून सोडण्याचा संकल्प सोडलेल्या केतनशी आम्ही या भागात गप्पा मारल्या आहेत. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी Friends Union for Energising Lives (F.U.E.L.) ही NGO स्थापन करून भारतातल्याच नव्हे तर परदेशातल्याही लाखो मुलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आत्मनिर्भर होण्यासाठी विश्वास देणारा असा हा केतन देशपांडे आता कौशल्य आधारित शिक्षणासाठी सुसज्ज असे विद्यापीठ पुण्यात लवकरच सुरु करतोय.  आजूबाजूच्या परिस्थितीला केवळ दोष देण्यापेक्षा आपल्या परीने शिक्षणाला केवळ नोकरी/उद्योगाशीच नाही तर जगण्याशी जोडून घेणारा केतनचा प्रवास, आणि त्याचे विचार नक्की ऐका. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते हे पण जरूर कळवा. #youth_empowerment #social_entrepreneurship #STEM #शिक्षण #कौशल्य_आधारित_शिक्षण #रोजगार  या भागात आलेले संदर्भ:  केतन देशपांडे Friends Union for Energising Lives Atal Tinkering Labs  वटवटकार: पराग, सागर आणि रोहित प्रतिक्रियेसाठी : Facebook: https://www.facebook.com/MetkootPodcast Instagram: https://www.instagram.com/metkootpodcast/ Twitter: https://twitter.com/metkootPodcast https://www.youtube.com/watch?v=B7ytTj1ALdw #मेतकूट #मराठी #पॉडकास्ट
50:02
January 16, 2022
दुसऱ्या सत्राची नांदी (रोहित)
गेल्या तीन महिन्यात आपण दर रविवारी भेटत आलो. २०२१ सोबत आपण मेतकूट पॉडकास्टच्या पहिल्या सत्राची सांगता सुद्धा केली. या प्रवासात आत्तापर्यंत तुम्ही दिलेली साथ, सल्ले, सूचना, आणि महत्वाचं म्हणजे प्रतिक्रिया खूपच आवडल्या. त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप आभार. आता as promised, आम्ही मेतकूट पॉडकास्टचे दुसरे सत्र तुमच्याकडे घेऊन येण्यासाठी सज्ज आहोत. जशी साथ, जे प्रेम तुम्ही गेल्या तीन महिन्यात दिलं, ते वृद्धिंगत होईल ही आशा करतो. लवकरच नवे भाग प्रदर्शित करू. त्यासाठी पॉडकास्टच्या चॅनेलला spotify, apple podcast, google podcast किंवा youtube यापैकी तुम्हाला जे काही आवडत असेल तिथे subscribe करून ठेवा. त्यामुळे आम्हाला तुमच्यापर्यंत पोचायला मदत होईल. यंदाच्या सत्रामध्ये आमच्या काही मित्र मैत्रिणींना सुद्धा आम्ही आमंत्रित केलेले आहे. त्यांच्या आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं काम, आणि म्हणून घडलेला त्यांचा दृष्टिकोन तुमच्यापर्यंत आणण्याचा आमचा मानस आहे. यातून ज्या काही गप्पा जमल्या, त्यांची सरमिसळ करून बनलेलं हे मेतकूट. हे लोक कोण आणि त्यांचे विषय कोणते हे लवकरच सांगू. सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करा  Twitter: @metkootPodcast / Facebook: @MetkootPodcast / Instagram:  @metkootpodcast #marathipodcast #podcast #म #marathi #मराठीभाषा #metkoot
01:16
January 10, 2022
मेतकूट च्या दुसऱ्या पर्वाची नांदी | Season 2 Teaser
#मेतकूट #मराठी #पॉडकास्ट  मेतकूट च्या पहिल्या सत्राला मिळालेला प्रतिसाद पाहता आम्हांला दुसऱ्या पर्वाची तयारी करण्यासाठी उत्साह संचारला आहे. लवकरच भेटू पुढच्या आठवड्यापासून दर रविवारी एका नवीन भागात, एका नवीन स्वरूपात काही इंटरेस्टिंग पाहुणे मंडळींना सोबत घेऊन.  तुमच्या आवडीच्या पॉडकास्ट माध्यमातून (Spotify, Apple Podcast / Google Podcast / Anchor) सब्सकाइब करा म्हणजे तुम्हाला पुढचे सगळे भाग तुम्हाला पटकन ऐकता येतील.  सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करा  Twitter: @metkootPodcast / Facebook: @MetkootPodcast / Instagram:  @metkootpodcast #marathipodcast #podcast #म #marathi #मराठीभाषा #metkoot
01:43
January 02, 2022
S1.E11 - पहिल्या आवृत्तीची सांगता, पुन्हा भेटूच
तर याप्रकारे मेटकूटच्या पहिल्या आवृत्तीची आज सांगता करत आहोत. त्यासाठी गेल्या दहा आठवड्यांचा हा धावता आढावा. पुढच्या आवृत्तीची तयारी जोरात सुरू आहेच. थोडी पाहुणे मंडळी, थोडं वेगळं ठिकाण, आणि तुमचे नेहमीचेच वटवटकार घेऊन आम्ही काही आठवड्यात परत प्रकट होऊच. पण तोपर्यंत, तुमचं प्रेम असंच देत राहा. आपल्या मित्र मैत्रिणींना या पॉडकास्ट बद्दल सांगा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचावा. आता हे मेतकूट जमू लागलंय. बाकी, नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. आणि सुरक्षित राहा. काळजी घ्या. हे सांगायला नकोच. Please subscribe and share. वटवटकार: पराग, सागर आणि रोहित प्रतिक्रियेसाठी : Facebook / Instagram / Twitter / email #मेतकूट #मराठी #पॉडकास्ट
38:60
December 26, 2021
S1.E10 - अघळ पघळ
इतक्या आठवड्यात इतके विषय बघितले, मग उगाच असा विचार आला, थोडासा लाईट लिया जाये. म्हणून मग या आठवडयात बीना विषय भेटलो, गप्पा मारल्या. जुन्या लहानपणीच्या आठवणी असं घ्यायचं ठरलं होतं, पण त्याच जे काय झालं ते तुम्हाला कळेलच.  वटवटकार: पराग, सागर आणि रोहित प्रतिक्रियेसाठी : Facebook / Instagram / Twitter / email #मेतकूट #मराठी #पॉडकास्ट
32:48
December 19, 2021
S1.E9 - शिकायचं कसं हे सुद्धा शिकावं लागेल काय?
शिकण्यासाठी आता इतक्या गोष्टी उपलब्ध आहेत, की काय सांगा? पण तरीसुद्धा सगळ्यांना सगळंच जमतंय असंही होत नाही न? मग शिकायचं कसं यातसुद्धा काहीतरी कलाकारी असेल काय? आजच्या गप्पा या विषयावर.   तुम्ही कसं शिकता नव्या गोष्टी? तेही जरूर सांगा. वटवटकार: पराग, सागर आणि रोहित प्रतिक्रियेसाठी : Facebook / Instagram / Twitter / email #मेतकूट #मराठी #पॉडकास्ट
28:34
December 12, 2021
S1.E8 - भाषा आणि भाषेचा आग्रह
जगभर कित्येक हजार भाषा आहेत. या भाषांमध्ये शब्दांची देवाण घेवाण सुरुच असते. हे पूर्वापार सुरु आहे. पण त्याच बरोबर प्रत्येक भाषा त्या त्या ठिकाणाचा थोडाफार इतिहास, भूगोल, संस्कृती सुद्धा जपते. मग या पार्श्वभूमीवर  थोडीशी चर्चा शुद्ध भाषा, आणि त्याचा भाषाशुद्धीच्या आग्रह यावर चर्चा. वटवटकार: पराग, सागर आणि रोहित प्रतिक्रियेसाठी : Facebook / Instagram / Twitter / email #मेतकूट #मराठी #पॉडकास्ट या भागात आलेले संदर्भ:  यु.म. पठाण यांचे फारसी-मराठी अनुबंध पुस्तक  How language shapes the way we think | Lera Boroditsky  BBC Article: https://www.bbc.com/marathi/india-511... 
37:14
December 05, 2021
S1.E7 - शिक्षण, त्याचा वापर, आणि गरज
काय शिकावं? कसं शिकावं? शिकलं ते वापरलं जातं का? वगैरे वगैरे प्रश्न आपल्या माहितीचेच. शाळा कॉलेज चा प्रवेश जवळ आला असेल तर हे सगळं अजूनच जास्ती जवळचं. आम्ही पॉडकास्टच्या आजच्या भागामध्ये या सगळ्या बाजू हाताळायचा प्रयत्न केलाय. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? तुमच्या काय आठवणी आहेत? वटवटकार: पराग, सागर आणि रोहित प्रतिक्रियेसाठी : Facebook / Instagram / Twitter / email #मेतकूट #मराठी #पॉडकास्ट
38:32
November 28, 2021
S1.E6: Efforts behind the fund raising
कोरोनाव्हायरसमुळे जगभर आलेल्या महामारीतून मार्ग काढण्यासाठी, खूप लोकांनी, संस्थांनी मदतीचा हात पुढे केला. जशा जमेल त्या पद्धतीने लोक एकत्र आले, आणि त्यांनी हे शक्य करून दाखवलं. हा प्रवास अजून संपलेला नाही. पण तरीही आता शेवट दृष्टीक्षेपात येतोय असं वाटतंय.    यामध्ये, पैसे उभं करण्याचं काम, मदत पोचवण्याचं काम सागरने बघितलं. स्वतः जबाबदारी उचलली. तर या भागामध्ये त्याच्याकडून त्याचा अनुभव ऐकुया.   वटवटकार: पराग, सागर आणि रोहित प्रतिक्रियेसाठी : Facebook / Instagram / Twitter / email #मेतकूट #मराठी #पॉडकास्ट #fundraising #covid #maharashtra #relief 
35:32
November 21, 2021
S1.E5 - सोसल (तेवढंच) मीडिया
"सोशल डिलेमा" डॉक्युमेंटरी पाहिल्यानंतर जे विचारचक्र सुरु झालं त्यावर मारलेल्या ह्या गप्पा. काय बरं आहे हा विषय? खरंच घाबरण्या सारखं आहे का? की अजून थोडी माहिती काढली पाहिजे? असं सगळं...   वटवटकार: पराग, सागर आणि रोहित प्रतिक्रियेसाठी : Facebook / Instagram / Twitter / email #मेतकूट #मराठी #पॉडकास्ट गप्पांमध्ये आलेले काही संदर्भ : 1. The Social Dilemma (Netflix Documentary) 2. Cambridge Analytica (https://en.m.wikipedia.org/wiki/Facebook%E2%80%93Cambridge_Analytica_data_scandal) 3. Happiness Lab (https://www.happinesslab.fm/)
37:60
November 14, 2021
S1.E4 - Equality हवीच का?
समानता हा खूप गंभीर विषय आहे. कित्येक वर्षांनुवर्षे हा वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या समोर येताच राहिलाय. याच बद्दल आज आम्ही थोडीशी चर्चा केली. एकमेकांची मतं जाणून घेतली. बघा तुम्हाला काय वाटतंय? वटवटकार: पराग, सागर आणि रोहित प्रतिक्रियेसाठी : Facebook / Instagram / Twitter / email #मेतकूट #मराठी #पॉडकास्ट
37:40
November 07, 2021
S1.E3 - Polarisation कशाशी खातात?
टोकाच्या भूमिका, त्याची सध्याच्या काळातली उदाहरणं आणि आमच्या परीनं केलेलं विश्लेषण. खरंच हे खूप वाढलंय का? कितपत धोका आहे याचा? याचं काही करता येऊ शकतं का? हे असं बरंच काही. गप्पांमध्ये आलेले संदर्भ टीम मिनचिनचं ग्रॅज्युएशनच्या वेळेचं भाषण - https://www.youtube.com/watch?v=yoEezZD71sc माईन काम्फ - https://www.hitler.org/writings/Mein_Kampf/ हेन्री किसिंजर - https://en.wikipedia.org/wiki/Henry_Kissinger बील वॉटर्सनचं ग्रॅज्युएशनच्या वेळेचं भाषण (१९९०) - https://www.youtube.com/watch?v=zVLYp2pdsq8 https://web.mit.edu/jmorzins/www/C-H-speech.html वटवटकार: पराग, सागर आणि रोहित प्रतिक्रियेसाठी : Facebook / Instagram / Twitter / email #मेतकूट #मराठी #पॉडकास्ट
37:36
October 31, 2021
S1.E2 - मनातल्या मनात
आपल्या मानाचं प्रकरण जेवढं खोलात शिरावं तसं प्रत्येकाचं एकसारखंच तरीही वेगवेगळं. या मनाला समजून घेण्याचे, थोडं नियंत्रित करायचे प्रचलित मार्ग कोणते? आपल्याला कोणते जमतात? या मनाचा किंवा मेंदूचा आभ्यास कोणी केलाय का? वगैरे वगैरे वटवटकार: पराग, सागर आणि रोहित प्रतिक्रियेसाठी : Facebook / Instagram / Twitter / email #मेतकूट #मराठी #पॉडकास्ट गप्पांमधले आलेले काही संदर्भ भीष्मराज बाम यांची पुस्तके - https://www.amazon.in/s?k=bhishmaraj+bam The Last Dance - https://www.netflix.com/title/80203144 जो डिस्पेंझा - https://drjoedispenza.com/ स्टोइसीजम - https://en.wikipedia.org/wiki/Stoicism डेव्हिड इगलमॅनची ब्रेन वरची डॉक्युमेंटरी - https://www.bbc.co.uk/programmes/b06yjrdp/episodes/guide मी अल्बर्ट एलिस, अंजली जोशी - https://www.amazon.in/Mi-Albert-Ellis-Anjali-Joshi/dp/B07NC5FDFW/
53:19
October 24, 2021
S1.E1 - Diabetes, Genetics and Sapiens
दर शनिवारी एकत्र येऊन गप्पा मारू असं ठरवल्यानंतरचा हा पहिला भाग. यामध्ये सागरने त्याचा डायबेटीस बद्दलचा त्याचा अनुभव आणि त्याच्याशी निगडित समज आणि गैरसमज सांगितलेत. परागने सेपियन्स पुस्तकाबद्दल चर्चा केलीय तर रोहितने जेनेटिक्स मध्ये काय बघितलं ते सांगितलय. वटवटकार: पराग, सागर आणि रोहित प्रतिक्रियेसाठी : Facebook / Instagram / Twitter / email #मेतकूट #मराठी #पॉडकास्ट
49:56
October 14, 2021
मेतकूट, परागच्या मते
गेले काही महीने मी आणि माझे दोन मित्र- सागर आणि रोहीत - आम्ही एक प्रयोग करून बघितला.दर शनिवारी एका ठरावीक वेळी एकत्र येऊन ऑनलाईन गप्पा  मारल्या.  विषय कोणते? तर  एखादे चांगले पुस्तक,  बघितलेला सिनेमा/डॉक्युमेंटरी किंवा आवडीचा वाटेल, समजावुन घ्यावा वाटेल असा एखादा विषय.   खरं तर  यात बोलताना जेवढी मजा  आली त्यापेक्षाही खूप जास्त मजा ऐकण्यात आली. अनेक नवीन पुस्तके, नवीन विषय, काही interesting लोकं यांचे references मिळाले आणि एका  विषयाकडे किती वेगवेगळ्या  दृष्टिकोणातून पाहता येते याचीही  जाणीव झाली. विषयांची, विचारांची, माहितीची अणि दृष्टीकोणांची ही  साधी, सोपी सरमिसळ म्हणजे हे जमलेले मेतकूट! बघा तुम्हालाही हे सकस आणि पौष्टिक वाटतय का? पण प्रतिक्रिया मात्र जरूर कळवत राहा म्हणजे हा प्रयोगात आम्हाला अजून सुधारणा करता येतील. प्रतिक्रिया थेट मला सांगू शकता, किंवा kanokani.vatvat@gmail.com इथे कळवू शकता. तेव्हा आता दर आठवड्यात भेटत राहूच. पराग
01:27
October 13, 2021
मेतकूट, रोहितच्या मते
गेल्या काही महिन्यात, बैठे बैठे क्या करे म्हणत म्हणत, आम्ही एक पॉडकास्ट बनवला. तो आता हळू हळू तुमच्या पर्यंत पोचवायचा विचार आहे. सध्या सगळं प्रायोगिक तत्वावर आहे. पण मेतकूट जमलंच तर अजूनही बरंच काही काही करू. त्यासाठी तुमच्या प्रतिक्रियेची, सल्ल्यांची आणि प्रोत्साहनाची गरज आहे. विषय आपल्या ऐकिवातले, काही नेहमीचे, काही नवे, असे आहेत. सध्या पहिला भाग रिलीज केलाय. तुम्ही हे Apple Podcast, Spotify, Google Podcast पैकी तुमच्या सरावाच्या ऍप मध्ये ऐकू शकता. प्रतिक्रिया थेट मला सांगू शकता, किंवा kanokani.vatvat@gmail.com इथे कळवू शकता. बाकी पुढचे भाग दार वीकेंडला टाकत राहू. रोहित 
01:17
October 13, 2021
मेतकूट, सागरच्या मते
गेल्या काही आठवड्यात आम्ही एक प्रयोग म्हणून एकत्र आलो आणि आपल्या आवडीच्या विषयावर गप्पा मारल्या. गप्पा कुठल्या विषयांवर? तर ... कुठल्याही ... एखादं वाचलेलं पुस्तक, पाहिलेली डॉक्युमेंटरी, सध्याच्या घडामोडी यामधलं जे समजलं, जसं समजलं, जेवढं समजलं त्यावर. बरेचसे विषय चाळून झाले. अजूनही खूप विषयांमध्ये हात घालता येईल.  पण मग हा उपद्व्याप कशाला?  तर एक तर मेरी आवाज सुनो ही खाज भागवायला, नवीन काहीतरी शिकायला, आणि समविचारी लोकांपर्यंत पोचायला आणि पोचवायला. आता आम्ही तर यातल्या सगळ्याच किंवा कुठल्याही विषयांमध्ये पारंगत असूच असं नाही. पण तुम्ही असूच शकता. तेव्हा, अजिबात न लाजता, ताबडतोब प्रतिक्रिया मात्र कळवत राहा.  तुमच्या माहितीचे कोणी असतील, ज्यांना अशा गप्पा ऐकायला आवडतील, हे त्यांनाही पाठवा. बाकी नेहमीचं ड्रिल, तुम्हालाही माहिती आहेच की. तर ते सगळं लाईक शेअर आणि सबस्क्राईब वगैरे करा.  तर आता मग या सगळ्या विषयांची, विचारांची, जी सरमिसळ होणार आहे, ते हे मेतकूट, तुमच्यापर्यंत पोचवायचा हा छोटा प्रयत्न. डिलिव्हरी चार्जेस शून्य. कळावे आपला, सागर प्रतिक्रियेसाठी kanokani.vatvat@gmail.com
01:41
October 13, 2021