Skip to main content
Screen Time With Mukta

Screen Time With Mukta

By muktachaitanya

नमस्कार,
स्क्रीन टाइम विथ मुक्ता या माझ्या पॉड कास्ट मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. या पॉडकास्टमध्ये आपण सायबर चॅट करणार आहोत. ऑनलाईन ट्रेंड्सपासून सायबर स्पेसचा आपल्यावर होणाऱ्या परिणामांपर्यंत सगळ्यांबद्दल मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे.
ऐकत राहा, स्क्रीन टाइम विथ मुक्ता
Currently playing episode

मॅट्रिमोनिअल फ्रॉड्स म्हणजे काय?

Screen Time With MuktaDec 09, 2022

00:00
27:17
मॅट्रिमोनिअल फ्रॉड्स म्हणजे काय?

मॅट्रिमोनिअल फ्रॉड्स म्हणजे काय?

पुण्यातल्या एका तीस वर्षीय महिलेने मॅट्रिमोनिअल फ्रॉडमध्ये २० लाखांहून अधिक रक्कम गमावली आहे. रोज देशभरात कुठे ना कुठे अशा पद्धतीच्या फसवणुकीच्या बातम्या येत असतात. हा सगळा प्रकार काय असतो? कशापद्धतीने लोकांना टार्गेट केलं जातं, आपण अशा कुठल्याही जाळ्यात सापडू नये यासाठी काय केलं पाहिजे, हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणूनच हा सगळा विषय आपण समजून घेणार आहोत प्रसिद्ध सायबर वकील ऍड. वैशाली भागवत यांच्या कडून..

ऐकत राहा, स्क्रीन टाइम विथ मुक्ता

Dec 09, 202227:17
सोशल मीडियावर किती वेळ जातो?

सोशल मीडियावर किती वेळ जातो?

कोरोना महामारीत आपण सोशल डिस्टनसिंगची सतत चर्चा करत होतो, पण व्हर्चुअल सायकॉलॉजीकल डिस्टनसिंगचा कधी विचार केलाय का?

आपण गुंतून पडलो आहोत का आभासी जगात?
भावनिक आणि मानसिक वेळ किती द्यायचा हे ठरवण्याची वेळ आली आहे का?

सोशल मीडियावर आपला किती वेळ जातो याचा कधी विचार केलाय का?

जाणून घ्या, या भागात!

Dec 06, 202204:57
सायबर स्पेसमधले 6 रेड अलर्ट्स!

सायबर स्पेसमधले 6 रेड अलर्ट्स!

सायबर स्पेसमध्ये मुलं चटकन टार्गेट केली जातात. अशावेळी त्यांना धोक्याच्या सूचना देणं आवश्यक आहे. धोके कुठे असू शकतात, ते कसे ओळखायचे हे मुलांना माहीत असेल तर ते अधिक सजगपणे ऑनलाईन वावरू शकतात. जाणून घ्या सायबर स्पेसमधले रेड अलर्ट्स !

Dec 06, 202204:11
सायबर हल्ला म्हणजे काय?

सायबर हल्ला म्हणजे काय?

काही महिन्यांपूर्वी वृत्तपत्रात चीन भारतावर सायबर हल्ला केल्याच्या बातम्या आपण वाचल्या.  हल्ले वरचेवर होत असतात. असंही म्हटलं जातं यापुढची युद्ध ही सायबर स्पेसमध्येच खेळली जातील. सायबर हल्ला म्हणजे नेमकं काय? सायबर वॉर काय असतं? सायबर वॉर  होऊ नये म्हणून युजर्सनी काय काळजी घ्यायला हवी हे समजून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी आजच्या पॉडकास्टमध्ये विशेष गप्पा मारल्या आहेत प्रसिद्ध सायबर वकील ऍड. वैशाली भागवत यांच्याशी.

Dec 06, 202220:58
मोबाईल बंदीने प्रश्न सुटेल का?

मोबाईल बंदीने प्रश्न सुटेल का?

यवतमाळ जिल्ह्यातील बांसी ग्रामसभेने १८ वर्षांच्या खालच्या मुलांवर मोबाईल बंदी आणली आहे. पण अशा मोबाईल बंदीने मुलांच्या मोबाईल आणि इंटरनेट वापराचे प्रश्न सुटू शकतात का?

याच विषयावर रिस्पॉन्सिबल नेटिझम या मुंबईतल्या सेवाभावी संस्थेच्या सहसंपादक उन्मेष जोशी यांच्याशी मारलेल्या विशेष गप्पा.

Dreamers by Mixaund | https://mixaund.bandcamp.com

Nov 29, 202221:58