Skip to main content
'Selfless' Parenting !!!

'Selfless' Parenting !!!

By Shilpa Inamdar Yadnyopavit

इथे तुम्हाला पालकत्वाविषयी अनेक तज्ञ व्यक्तींचे; पालकत्वाच्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांवरचे interviews, tips , parenting वरील उपयुक्त पुस्तकांची माहिती , वेगळ्या आणि अनोख्या पद्धतीने मुलांना वाढवलेल्या काही पालकांचे अनुभव , मुलांबरोबर आणि मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींविषयी माहिती आणि आणखीनही बरंच काही असणारे !!! MARATHI PODCAST where you can get to "LISTEN & LEARN" many important things about "PARENTING" that really MATTERS !!! In short , one stop solution for all your parenting concerns & needs :) चला तर मग, सुरु करूया 'प्रवास अजाण ते सुजाण पालकत्वाचा !!!
Currently playing episode

मुलांची "शाळा" घेताय ... ?!! with Rajiv Tambe [ Children's Writer & Editor ] Ep. 26

'Selfless' Parenting !!!Jun 21, 2022

00:00
45:33
मुलांची "शाळा" घेताय ... ?!! with Rajiv Tambe [ Children's Writer & Editor ] Ep. 26

मुलांची "शाळा" घेताय ... ?!! with Rajiv Tambe [ Children's Writer & Editor ] Ep. 26

२ वर्षांच्या मोठ्या गॅप नंतर मुलं पुन्हा शाळेत जाऊ लागली आहेत .. पण यावेळची परिस्थिती बरीच वेगळी आहे... एका मोठ्या महामारीला आपण सगळेच सामोरे गेलोय ; त्याचे परिणाम भोगलेत किंवा येणाऱ्या काळात कदाचित ते नव्यानेही जाणवतील.. विशेषतः मानसिक दृष्टीने .. कळते सवरते असून आपली अशी अवस्था तर मुलांचं काय? ती तर बिचारी अनेक गोष्टींपासून अनभिज्ञच आहेत .. याच नाजूक काळात त्यांना आणि स्वतःला कसं सांभाळायचं ? त्यांच्याशी कसं वागायचं ? त्यांची मदत कशी करता येईल ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आज आपल्याबरोबर आहेत राजीव काका अर्थात राजीव तांबे !!! एक बाल साहित्यकार म्हणून ते जेवढे सुपरिचित आहेत तेवढेच ते उत्तम शिक्षक आणि मार्गदर्शकही आहेत !!! कोविड सारख्या एका वेगळ्याच आणि गंभीर परिस्थितीतून बाहेर पडत पुन्हा हा शाळांकडे,अभ्यासाकडे परतण्याचा प्रवास सुरु करताना मुलांबरोबरच पालक आणि शिक्षकही तेवढेच बावरले आहेत.. साशंक आहेत आणि या सगळ्याशी deal करताना काय केलं पाहिजे ? काय टाळलं पाहिजे ? मुलांना कसं हाताळलं पाहिजे ? अशा अनेक गोष्टींवर त्यांच्या खास आणि खुमासदार शैलीत  झालेल्या गप्पा खास तुमच्यासाठी...तेव्हा नक्की ऐका, follow आणि share करा आपल्या या मराठी पॉडकास्टला !!! 


Jun 21, 202245:33
Dr. Sushma Kulkarni [Director- Rajarambapu Inst. of Technology] on Positive Parenting !!!

Dr. Sushma Kulkarni [Director- Rajarambapu Inst. of Technology] on Positive Parenting !!!

#globalparentsday Special नक्की ऐका !!! 

काल झालेल्या जागतिक पालक दिनाच्या निमित्ताने Selfless Parenting या आपल्या मराठी पॉडकास्टच्या वर्षपूर्ती नंतरची पहिली पोस्ट एका खूप महत्वाच्या व्यक्तीकडून मिळालेला प्रतिसाद आणि मार्गदर्शन आहे. Rajarambapu Institute of Technology  या अतिशय नावाजलेल्या शिक्षणसंस्थेबरोबर गेली अनेक वर्ष एक उत्तम प्रोफेसर ते प्रिन्सिपॉल ते डायरेक्टर असा प्रवास केलेली माझी मामी जी अतिशय उत्तम पालक सुध्दा आहे ; ती म्हणजे Dr. Sushma Kulkarni !!! आज तुमच्यासमोर ती तिचे पालकत्वाविषयीचे विचार मांडतीये...खरं तर एक व्यक्ती म्हणून तिच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे आणि माझ्या या उपक्रमाच्या संकल्पनेपासून ते आजवरच्या प्रवासात वेळोवेळी तिने मला खूप प्रोत्साहन दिलंय. असंख्य पालक आणि मुलं जिच्या संपर्कात रोज येत असतात आणि एक शिक्षक आणि संचालक म्हणून तिला सध्याच्या काळातल्या पालकत्वाविषयी काय वाटतं? आणि अर्थात माझ्या कामाविषयीसुद्धा ते जाणून घेऊया तिच्याच कडून... 

Jun 02, 202208:15
Encouraging Endorsements series - 10 - Prasad Manerikar

Encouraging Endorsements series - 10 - Prasad Manerikar

Thanks for this appreciation Prasad Dada !! Selfless Parenting या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आमंत्रित पाहुण्यांना, मित्र-मैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं ? हे माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. तुम्ही देखील तुम्हाला माझा हा प्रयत्न कसा वाटतो? याविषयी तुमच्या ध्वनिमुद्रित/लिखित प्रतिक्रिया पाठवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ किंवा लिखित प्रतिसाद  shini3015@gmail.com वर पाठवा... निवडक feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी दिली जाईल !!! वाट बघतीये.. Appreciation always appreciated !!! 

May 20, 202202:45
'Selfless' Parenting turned 1 🥳 - FIRST Milestone Achieved !!!

'Selfless' Parenting turned 1 🥳 - FIRST Milestone Achieved !!!

कुठल्याही बाबतीत 'पहिल्या' गोष्टीला आपल्याकडे खूप महत्वाचं मानलं जातं !! तीच गोष्ट माझ्या पॉडकास्टच्याही बाबतीत घडतीये.. मला, पालकत्व या विषयावर आधारीत असणारा माझा 'सेल्फलेस पेरेंटिंग' हा मराठीतून असणारा पॉडकास्ट सुरु केल्याला १ वर्ष पूर्ण झालं !!! आणि त्यातही २५ भाग म्हणजे एपिसोडस ची silver jubilee सुध्दा झाली !!! खरं तर या मध्ये मला साथ , पाठींबा आणि प्रोत्साहन दिलेल्या सगळ्यांचीच खूप महत्वाची भूमिका आहे आणि असणार आहे पण या सुंदर दिवसाची आठवण कायम राहावी म्हणून हा एक छोटासा प्रयत्न... माझा हा आजवरचा प्रवास, त्यातले काही milestones आणि माझ्या मित्रांनी या निमित्ताने मला दिलेल्या प्रतिक्रिया आणि शुभेच्छांची छोटीशी झलक खास तुमच्यासाठी !!! लोभ कायम असुद्या इथून पुढच्या वाटचालीसाठी- शिल्पा इनामदार यज्ञोपवित. 

Thanks a lot Nachiket Kshire Dhiraj Deshpande Mangesh Wagh Sameer Athalye for your wonderful words.. means really a lot !!! 

May 12, 202205:60
शाळा नेमकी असते कशासाठी ? - with Rushikesh Dabholkar [Founder-Atakmatak.com, storyteller & freelance writer] Ep. 25

शाळा नेमकी असते कशासाठी ? - with Rushikesh Dabholkar [Founder-Atakmatak.com, storyteller & freelance writer] Ep. 25

घरात मूल जन्माला यायचा अवकाश पालकांना त्याच्या उज्वल भवितव्याविषयी निर्माण होणाऱ्या काळजीत "शाळा" हा फार महत्वाचा मुद्दा असतो !! त्यावरून घराघरांत काय घडतं? ते वेगळं सांगायला नको ..आणि ते पूर्णतः चुकीचं आहे असंही नाही पण तरीही आपण आपल्या मुलासाठी एखादी शाळा का निवडतो? त्यासाठी कुठले निकष पडताळतो ? अमुक शाळा माझ्या मुलासाठी बेस्ट असेल हे कुठल्या परिमाणांवर तपासतो ? असे अनेक प्रश्न बऱ्याच पालकांना पडलेलेच नसतात की फक्त so called reputed असणाऱ्या ठिकाणी पैसे भरणे हे एकच आपलं आद्यकर्तव्य आहे असं वाटू लागलंय हेच कळेनासं झालंय ...शाळा नेमकी असते कशासाठी ? हा प्रश्न कधी पडतो का आपल्याला ? पडला असेल आणि त्याचं उत्तर हवं असेल तर आजचा भाग नक्की ऐका !! या बद्दल अतिशय रास्त आणि सुयोग्य पद्धतीने विवेचन करून देण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत ऋषिकेश दाभोळकर !!! प्रोफेशनली इंजिनियर आणि पॅशनेटली लेखक , स्टोरीटेलर आणि बरंच काही !! मुलांसोबत आणि मुलांसाठी काम करायला खूप आवडतं म्हणून त्यांनी अटकमटक. कॉम ची निर्मिती केली. पालकनिती, चिकूपिकू अश्या मासिकांतून तसंच अक्षरनामा, ऐसी अक्षरे आदी अंकांमध्ये, लोकमत सारख्या वृत्तपत्रातून ते सातत्याने लिखाण करत असतात. गोष्टींचे अभिवाचन करणे, नाट्यमय सादरीकरण करणे, मुलांशी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारणे या गोष्टी मनापासून करणारा मुलांचा लाडका ऋषिकेश दादा एक संवेदनशील कवी मनाचा 'बाबा' देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया अशा या multi talented व्यक्तिमत्वाला आपल्या सेल्फलेस पेरेंटिंग च्या आजच्या भागात.... 

Apr 27, 202237:46
Encouraging Endorsements series - 9 Sukirt Gumaste

Encouraging Endorsements series - 9 Sukirt Gumaste

Thanks for this encouragement Sukirt Gumaste !! Selfless Parenting या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आमंत्रित पाहुण्यांना, मित्र-मैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं ? हे माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. तुम्ही देखील तुम्हाला माझा हा प्रयत्न कसा वाटतो? याविषयी तुमच्या ध्वनिमुद्रित/लिखित प्रतिक्रिया पाठवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ किंवा लिखित प्रतिसाद  shini3015@gmail.com वर पाठवा... निवडक feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी दिली जाईल !!! वाट बघतीये .. Appreciation always appreciated !!! 

Apr 15, 202201:33
Raising & Rising Healthy [World Health Day special episode] - with Dr. Shilpa Chitnis-Joshi [Gynecologist & Obstetrician]- Ep. 24

Raising & Rising Healthy [World Health Day special episode] - with Dr. Shilpa Chitnis-Joshi [Gynecologist & Obstetrician]- Ep. 24

आजच्या जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून पालकत्वाच्या अनेक कंगोऱ्यांमध्ये पालक आणि बालक दोघांनीही शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि सक्षम असणं का गरजेचं आहे? यावर आधारित असणाऱ्या, सेल्फलेस पेरेंटिंग या आपल्या मराठी पॉडकास्ट च्या आजच्या भागात मी तुमची होस्ट शिल्पा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते !!! होणाऱ्या आणि झालेल्याही पालकांनी स्वतःच्या आणि मुलांच्या आरोग्य , समस्या आणि उपाय याविषयी जागरूक असणं का गरजेचं आहे ? गेल्या काही वर्षात चुकीच्या जीवनशैलीमुळे नेमकं काय नुकसान होताना दिसतंय ? पालकत्व स्वीकारताना आणि निभावताना कुठल्या वैद्यकीय निकषांवर स्वतःला तपासणं आणि मुलांच्याही बाबतीत सजग असणं सध्याच्या काळात किती महत्वाचं आहे ? या आणि अशा अनेक बाबींवर आज आपण चर्चा करणार आहोत.. आज या विषयावर मार्गदर्शन करायला ; पुण्यातील एक प्रख्यात डॉक्टर म्हणून सर्वश्रुत असणाऱ्या एका खूप humble आणि friendly personality ला घेऊन आलेय , डॉ. शिल्पा चिटणीस जोशी !!! सुप्रसिद्ध स्त्री रोग व प्रसुती तज्ञ.. लंडन येथून IVF तंत्रज्ञानाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेल्या डॉ. शिल्पा एक निष्णात डॉक्टर आहेत. त्याचबरोबर त्या एक उत्तम लेखिका सुध्दा आहेत !! 'डॉक्टर... एक विचारू?' हे महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्या या विषयावरचं त्यांचं पुस्तकही प्रकाशित झालंय.तेव्हा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जास्तीतजास्त लोकांमध्ये शेयर करायला विसरू नका हा एपिसोड !!!

Apr 07, 202239:56
व्यसनाधीनता पालकांची...परवड मुलांची... ऐकूया दुसरी बाजू !!! - with Mrunmayee Agnihotri [Psychologist & Facilitator - IPH Thane] Ep.23

व्यसनाधीनता पालकांची...परवड मुलांची... ऐकूया दुसरी बाजू !!! - with Mrunmayee Agnihotri [Psychologist & Facilitator - IPH Thane] Ep.23

प्रत्येक एपिसोड मधून वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पालकत्व उलगडण्याचा सतत प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या ; Selfless Parenting या आपल्या मराठी पॉडकास्ट च्या माध्यमातून मी तुमची होस्ट शिल्पा आज पुन्हा एकदा एक वेगळा आणि नवीन perspective घेऊन आलेय !!! घरात असलेल्या ADDICTION या गोष्टीचा मुलांवर कसा परिणाम होतो ? ते यामध्ये कसे भरडले जाऊ शकतात ? त्यांच्या मनात अशा वातावरणामुळे काय आंदोलनं निर्माण होतात ? त्याचे त्यांच्या व्यक्तिमत्वावर आणि आयुष्यावर काय आणि कसे पडसाद उमटतात ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं दयायला आज आपल्याबरोबर अशाच परिस्थितीला एक मूल म्हणून सामोरी गेलेली आणि त्यातून खूप सकारात्मक पध्दतीने बाहेर येऊन स्वतःवरच नाही तर अशा परिस्थितीतून जाणाऱ्या सगळ्या मुलांसाठी काम करणारी आणि त्यांच्या मदतीसाठी IPH या संस्थेमार्फत "अंकुर" नावाचा मदतगट चालवणारी मृण्मयी अग्निहोत्री !!! मृण्मयी आज आपल्यासोबत ती दुसरी बाजू शेयर करणारे जी खूप जास्ती महत्वाची आहे ... मुलांची बाजू !!! व्यसनाधीन व्यक्तींच्या मुलांसाठी काम करणारी , त्यांच्यासाठी मदतगट चालवणारी मृण्मयी मुलांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून खूप छान बोलतं करते आणि या विषयावर तिच्या युट्युब वरच्या व्हिडीओज मधून खूप छान बोलतेही !! चला तर जाणून घेऊया तिच्याचकडून या दुसऱ्या बाजू विषयी आपल्या सेल्फलेस पॅरेंटिंगच्या आजच्या भागात. 

Mar 29, 202247:30
Experience 'Enriched' Parenting !! with Dr. Dinesh Nehete [Parenting coach & Founder Director :En-reach Foundation] Ep.22

Experience 'Enriched' Parenting !! with Dr. Dinesh Nehete [Parenting coach & Founder Director :En-reach Foundation] Ep.22

मुलांना 'समजून' घेणं म्हणजे नेमकं काय ? त्यांचं नैसर्गिक वर्तन समजून घेऊन कसा बदल केला तर मूल आणि आपण छान आनंदी राहू शकतो ? फक्त IQ नाही तर EQ सुद्धा का महत्वाचा असतो मुलांच्या सर्वांगीण विकासात ? पालक आणि शिक्षक यांनी भावनिक साक्षर असणं का गरजेचं आहे ? मुलांशी वागता बोलताना त्यांच्या आणि आपल्या भावनांचा स्विकार करणं का गरजेचं आहे ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी घेऊन आली आहे ; Parenting coach आणि En-reach foundation चे संस्थापक डॉ.दिनेश नेहेते सरांना !!!

नेहेते सर त्यांच्या या फौंडेशन च्या माध्यमातून "पालकत्व" या विषयावर खूप मौलिक काम करत आहेत .शिक्षक आणि पालक यांना उत्तम पिढी घडवण्यासाठी सक्षम करण्याचं काम En-reach Foundation करते. त्यांच्या या कामाचा फायदा आजवर जवळजवळ १८००० पालक , ३५०० मुलं आणि महाराष्ट्रातल्या जवळपास ४५ शाळांना झालाय !!! मानसशास्त्रातील अनेक अभ्यासक्रम पूर्ण करून; कॉर्पोरेट क्षेत्रातील करियर sacrifice करून, ते सध्या त्यांच्या संस्थेमार्फत parenting coach आणि counselor म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या गाढ्या अनुभवाचा फायदा तुम्हा सगळ्यांना नक्कीच होईल या आशेने आणि खात्रीने आज त्यांना आपल्या या पॉडकास्टवर आमंत्रित केलंय. बाकी त्यांच्याविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी आता त्यांच्याचकडून ऐकूया आजच्या Experience "Enriched" Parenting या एपिसोड मध्ये !!!

Mar 04, 202246:43
Feedback from a very genuine listener & follower of Selfless Parenting - Shailesh Mhapankar !!!

Feedback from a very genuine listener & follower of Selfless Parenting - Shailesh Mhapankar !!!

आज चा #feedbackfriday खूप स्पेशल आहे असं म्हणायला हरकत नाही !! कारण तो आजवर मला कधीही प्रत्यक्ष न भेटलेल्या किंवा वैयक्तिकरित्या न ओळखणाऱ्या पण Selfless Parenting च्या genuine follower कडून आलाय !!! खरंतर मी पॉडकास्ट सुरु केल्यापासून अनेक चांगल्या चांगल्या लोकांशी जोडले गेले आणि अनुभवांनीही समृध्द होत गेले, हे तर आहेच; पण आपण करत असलेल्या कामाला एखादी व्यक्ती अगदी सुरुवातीपासून follow करते; वेळोवळी त्या त्या एपिसोड विषयी प्रतिक्रिया ही देत असते आणि मग मिळतो इतका मनापासून आणि विचारपूर्वक दिलेला अभिप्राय !!! ही एका होस्ट साठी किती समाधान आणि प्रोत्साहन देणारी बाब आहे, हे कदाचित शब्दांत वर्णन करणं नाही शक्य ... काही गोष्टी या फक्त 'feel' च करण्यासारख्या असतात आणि पुढच्या कामासाठी उभारी देणाऱ्याही !!! त्यातलाच हा आजचा अप्रतिम अभिप्राय शैलेश म्हापणकर यांनी दिलेला !!! त्यांच्या आजवर मिळालेल्या प्रत्येक उत्स्फुर्त प्रतिक्रियांमधून मला नेहमी genuine gesture च जाणवलंय आणि जे माझ्यासाठी खूपच महत्वाचं आहे !!! खूप खूप धन्यवाद शैलेशजी... this means really a lot !!! शैलेश आणि मी आजवर virtually च भेटलोय आणि ओळखही social media च्या माध्यमातूनच झाली. आपल्या एखादया गोष्टीसाठी किंवा कामाविषयी इतकं आतून आणि भरभरून कौतुक असणारे ,वाटणारे आणि व्यक्त करणारे; त्यातही प्रशंसा करताना हातचं राखून न वागणारे लोक खूपच दुर्मिळ झालेले असताना; शैलेश मात्र त्याला अपवाद ठरले !!! नक्की ऐका , an inner voice of this #parent who believes that #parenting is a practicing art !!! Thanks Shailesh for this new perspective towards parenting as well #lovemylisteners !!!  

"Selfless Parenting" या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आपल्या आमंत्रित पाहुण्यांना , मित्र-मैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं ? याविषयी !!! तुम्ही देखील तुमच्या ध्वनिमुद्रित प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ आम्हाला shini3015@gmail.com वर mail करा... निवडक  feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी दिली जाईल !!! वाट बघतीये तुमच्या प्रतिसादाची , नक्की पाठवा. Appreciation always appreciated !!! 


Feb 25, 202202:18
होऊ 'मैत्र' पुस्तकांचे !!! with Manasee Mahajan [Story Teller & Founder - Jidnyasa Kids] -Ep.21

होऊ 'मैत्र' पुस्तकांचे !!! with Manasee Mahajan [Story Teller & Founder - Jidnyasa Kids] -Ep.21

Selfless Parenting या आपल्या मराठी पॉडकास्ट च्या नवीन सिझन ची सुरुवात नाविन्यपूर्ण एपिसोड ने करावी असं ठरवलं होतं !! गोष्टी ऐकून , वाचून आणि त्यातली चित्र बघून मुलं खूप काही शिकतात पण ते करण्यासाठी त्यांना कसं प्रवृत्त करता येईल? यावर एक एपिसोड करून पालकांना कशी मदत करता येईल याचा शोध घेता घेता एका अफलातून मुलीशी ओळख आणि मग मस्त मैत्री झाली !! मानसी महाजन !!! जिज्ञासा किड्स या संस्थेची founder आणि सगळ्यात छान ओळख म्हणजे "गोष्ट सांगणारी ताई" तिच्या 'जिज्ञासा किड्स' या संस्थेमधून मुलांची पुस्तकांशी मैत्री करून देण्याचे काम ती करते. मुलांसाठी ती रीडिंग क्लब चालवते, आणि ज्या मुलांना पुस्तके मिळू शकत नाहीत, अशा मुलांसाठी मानसी "पुस्तक खिडकी" नावाचे इ-मॅगझीन चालवते. लॉकडाऊन मध्ये मुलांना उत्तम गोष्टी ऐकता याव्यात यासाठी तिने 'कथा कविता खजाना' नावाचा Youtube चॅनेल सुरु केला आहे. पपेट शो च्या मध्यमातून गोष्टी सांगणे आणि वेगवेगळे कल्पक पपेट तयार करण्याची ती कार्यशाळा सुध्दा ती घेते.

खरंतर आणखी ही बरंच काही आहे तिच्याबद्दल सांगण्यासारखं पण मला वाटतं आपण ते तिच्याकडूनच ऐकूया आपल्या आजच्या भागात !!

Feb 21, 202240:09
'Gem' of a Parent - Dr. Saurabh Gadgil [MD & Chairman - PNG Jewellers] Ep.20

'Gem' of a Parent - Dr. Saurabh Gadgil [MD & Chairman - PNG Jewellers] Ep.20

"Think Pure" ही tagline वाचली किंवा ऐकली की एकच नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे P.N.Gadgil Jewellers !!! या नावाला प्रस्थापित केलं ते दाजीकाका गाडगीळ यांनी .. एका पेढीपासून सुरु झालेला हा प्रवास देशविदेशांत ३५ शाखांपर्यंत वाढवण्याची धुरा पेलली ती त्यांच्या नातवाने; अर्थात डॉ. सौरभ गाडगीळने !!! या तीन पिढ्यांच्या व्यवसायाबरोबरच या कुटूंबियांनी त्यांच्या मूल्य आणि सामाजिक उत्तरदायीत्वाच्या जाणिवेतून अनेक आदर्श निर्माण केले. इतका मोठा व्याप सांभाळणं, वाढवणं हे आव्हानात्मक आहे !! पण हे आव्हान सौरभने फक्त लीलया पेललं च नाही तर त्याच्या कारकीर्दीतून सिद्धही करून दाखवलंय की "शुद्ध विचार" काय किमया करू शकतात!! याच सगळ्या पार्श्वभूमीवर विचार करत असताना जाणवलं की, यामागे खूप सकारात्मक पद्धतीने केल्या गेलेल्या पालकत्वाचं strong foundation असलं पाहिजे. एक मूल म्हणून त्याची स्वतःची जडणघडण आणि एक पालक म्हणून तो करत असलेलं मुलांचं upbringing या बद्दल जाणून घेण्याचं प्रचंड कुतूहल निर्माण झालं!! त्याला आपल्या पॉडकास्ट वर बोलवावं आणि बोलतं करावं अशी इच्छा निर्माण झाली. जेव्हा याबाबतीत त्याच्याशी बोलणं झालं तेव्हा त्याने खूप positively त्याला मान्यता दिली आणि त्याचीच परिणीती आपल्या या आजच्या एपिसोड मध्ये झाली !! सौरभ सारख्या प्रतिथयश आणि तितक्याच उत्तम वडील असणाऱ्या व्यक्तीच्या पालकत्वाचा प्रवास उलगडणारी; ही पहिलीवहिली मुलाखत घेण्याची संधी मला लाभली, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे !! तुम्हीही खूप उत्सुक आहात ना .. चला मग भेटूया आणि जाणून घेऊया या Gem of a Parent विषयी त्याच्याचकडून...

Feb 11, 202230:39
Encouraging Endorsements series - 8 Sameer Samudra

Encouraging Endorsements series - 8 Sameer Samudra

"Selfless Parenting" या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आपल्या आमंत्रित पाहुण्यांना , मित्र-मैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं ? याविषयी !!! तुम्ही देखील तुमच्या ध्वनिमुद्रित प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ आम्हाला shini3015@gmail.com वर mail करा... निवडक  feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी दिली जाईल !!! वाट बघतीये तुमच्या प्रतिसादाची , नक्की पाठवा. Appreciation always appreciated !!!

Feb 04, 202202:03
'भूमिका : पडदयामागच्या पालकाची' - with Kiran Yadnyopavit [Writer, Director & Actor- Marathi & Hindi film and TV Industry] Ep. 19

'भूमिका : पडदयामागच्या पालकाची' - with Kiran Yadnyopavit [Writer, Director & Actor- Marathi & Hindi film and TV Industry] Ep. 19

सिनेसृष्टी आपल्या सगळ्यांनाच लहानपणापासून आकर्षित करत आलीये .. त्या वलयामध्ये वावरणाऱ्या लोकांबद्दल अप्रूप , कौतुक , उत्सुकता , आकर्षण , समज -गैरसमज हे सगळं कधीनाकधी आपल्या मनात येऊन गेलेलंच असतं. या क्षेत्रांत येणं , काम करणं आणि त्या वलयात राहूनही स्वतःचं वैयक्तिक आयुष्य वेगळं ठेवणं ; त्याचा समतोल राखणं अशी तारेवरची कसरत उत्तमरित्या सांभाळणं; खरच खूप आवाहनात्मक आहे.बरेच दिवसांपासून या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या 'parenting ' विषयी एक एपिसोड करावा असं खूप मनात होतं . कसे पेलत असतील ते ही जबाबदारी ? कशा पद्धतीने वाढवत असतील आपल्या मुलांना या सगळ्या त्यांच्या व्यापातून ? त्यांची खऱ्या आयुष्यातली एक पालक म्हणून भूमिका काय असेल ? असे अनेक प्रश्न होते मनात आणि त्यांचीच उकल करावी यासाठी जेव्हा विचार सुरु झाला तेव्हा एकच व्यक्ती डोळ्यासमोर आली आणि त्यांनाच या एपिसोड साठी आणायचं असं क्षणात ठरवलं आणि ते म्हणजे        किरण दादा अर्थात किरण यज्ञोपवित !!!

चला तर मग जाणून घेऊया “भूमिका : पडद्यामागच्या पालकाची” आपल्या सेल्फलेस पेरेंटिंग च्या आजच्या भागातून !!!

Jan 28, 202243:56
Encouraging Endorsements series - 7 Shubhangi Khasnis

Encouraging Endorsements series - 7 Shubhangi Khasnis

"Selfless Parenting" या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आपल्या आमंत्रित पाहुण्यांना , मित्र-मैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं ? याविषयी !!! तुम्ही देखील तुमच्या ध्वनिमुद्रित प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ आम्हाला shini3015@gmail.com वर mail करा... निवडक  feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी दिली जाईल !!! वाट बघतीये तुमच्या प्रतिसादाची , नक्की पाठवा. Appreciation always appreciated !!!

Jan 21, 202201:33
Techno "logical" Awareness !! -with Prasad Shirgaonkar [Technologist by profession & writer-poet-photographer by passion] - Ep.18

Techno "logical" Awareness !! -with Prasad Shirgaonkar [Technologist by profession & writer-poet-photographer by passion] - Ep.18

सध्या टेकनॉलॉजि आणि मुलं हा कळीचा मुद्दा झालाय आणि पालकांना त्या बाबतीत सजगपणे विचार करणं खूप गरजेचं आहे सध्याच्या काळात ..टेक्नॉलॉजी च्या नावाने फक्त खडे फोडण्यापेक्षा तिच्याबरोबर समतोल साधत कसं जगायचं हे आता शिकलं पाहिजे कारण ती आता आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनत चालली आहे !! मुलं तर या बाबतीत ४ पावलं पुढे असणारच आहेत पण त्यांना त्यातले धोके माहिती असतील च असं नाही; त्यांना त्यापासून सावध करण्यासाठी , त्यांची मदत करण्यासाठी आपल्यालाही 'techno -literate ' असणं खूपच गरजेचं आहे आताच्या काळात. आणि म्हणूनच हा समतोल साधत technology चा चांगला उपयोग कसा करता येईल याबद्दल जाणून घेऊया आपल्या आजच्या एपिसोड मध्ये 

२०२२ ची सुरुवात एका अत्यंत versatile guest सोबत करण्याची संधी मिळाली !! आजवर अनेक वर्तमानपत्रांतून , नियतकालिकांमधून , सोशल मिडिया च्या माध्यमांतून आपल्याला वरचेवर भेटणारा, त्याच्या ओघवत्या आणि सहजसोप्या लिखाणातून अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करणारा मोकळ्या मनाचा लेखक, दिलखुलास हसणारा, हसवणारा आणि नकळत डोळ्यांच्या कडा पाणवण्याची ताकद असणारा संवेदनशील कवी, एक उत्तम फोटोग्राफर आणि त्याचबरोबर अतिशय हुशार असा तंत्रज्ञ म्हणूनही नावाजलेला प्रसाद दादा अर्थात प्रसाद शिरगांवकर !!! एखादी व्यक्ती creative आणि intellectual दोन्ही पातळ्यांवर तेवढीच बेस्ट असू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रसाद दादा .

चला तर मग, techno 'logical' awareness विषयी जाणूनन घेऊया प्रसाद दादाकडून !!!

Jan 09, 202234:56
"Wrap-up 2021"- Glimpse of an amazing journey so far !!! Ep.17

"Wrap-up 2021"- Glimpse of an amazing journey so far !!! Ep.17

सादर आहे Selfless Parenting या माझ्या मराठी पॉडकास्ट मध्ये आजवर झालेल्या सगळ्या एपिसोड्स ची एक झलक !!! नक्की ऐका, गेल्या काही महिन्यातल्या आपल्या या प्रवासात काय काय घडलं? त्याविषयी... असं म्हणतात, when the "why" is clear, the how is easy !!! मला एखादी गोष्ट का करायची आहे? हे पक्कं माहिती असेल तर ती कशी करायची? याचे अनेक पर्याय सुचत जातात फक्त एकच गोष्ट लागते सुरुवातीला "इच्छाशक्ति " !!! ती जर असेल तर अवघड काहीच नाही . आणि याच गोष्टीची अनुभूती मी घेतली माझ्या या नवनिर्मिती मधून !!! देवाच्या कृपेने, आई बाबांच्या आशीर्वादाने, नवऱ्याच्या पाठिंब्याने, लहान असूनही 'आईचं रेकॉर्डिंग आहे,आवाज नाही करायचा' हे शहाण्यासारखं समजून वागणाऱ्या मुलींमुळे आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या ; माझ्या प्रत्येक निर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणी-आप्तेष्ट, मला साथ देणारे; माझ्यावर विश्वास ठेवून प्रत्येक एपिसोड उत्तम करणारे माझे सगळे गेस्ट्स आणि सगळ्यात महत्वाचं ; मला माझ्या या निर्मितीमुळे ओळखणाऱ्या माझ्या श्रोत्यांमुळे आज हा प्रवास खूपच समृद्धपणे चालू आहे!! तुम्ही आजवर भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार !!! तुमचं प्रेम , सदिच्छा अशाच पाठीशी असुद्या. येणाऱ्या नवीन वर्षात पालकत्वाच्या असंख्य कंगोऱ्यांवर आधारित अनेक नवनवीन एपिसोड घेऊन येईनच तर पुन्हा भेटू याच प्रवासात लवकरच selfless parenting या मराठी पॉडकास्टवर !!! नवीन वर्षात हा प्रवास अधिक समृद्ध व्हावा हीच कामना !!! Happy Parenting & Happy New Year. 

Dec 30, 202125:53
Encouraging Endorsements series-6 Sushma Padhye

Encouraging Endorsements series-6 Sushma Padhye

"Selfless Parenting" या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आपल्या आमंत्रित पाहुण्यांना , मित्र-मैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं ? याविषयी !!! तुम्ही देखील तुमच्या ध्वनिमुद्रित प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ आम्हाला shini3015@gmail.com वर mail करा... निवडक  feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी दिली जाईल !!! वाट बघतीये तुमच्या प्रतिसादाची , नक्की पाठवा. Appreciation always appreciated !!!

Dec 24, 202101:60
"Write" Understanding !!! - with Aditya Oak [Graphologist & Handwriting Expert] Ep.-16

"Write" Understanding !!! - with Aditya Oak [Graphologist & Handwriting Expert] Ep.-16

असं म्हणतात, "handwriting is an image of your personality"!! खरं तर हे वाक्य जेव्हा वाचनात आलं तेव्हा त्याचा नीटसा context माहिती नव्हता पण जेव्हा "ग्रॅफॉलॉजि " या क्षेत्राविषयी कळालं तेव्हा त्यातला गर्भितार्थ लक्षात आला. एखाद्याच्या हस्ताक्षर, सही किंवा कागदावर व्यक्त होण्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल , व्यक्तिमत्वाविषयी, त्याच्या विचारसरणी विषयी बऱ्याच गोष्टी कळू शकतात , त्याचा अभ्यास करून त्यावर काम करता येऊ शकतं आणि आणखीनही खूप कंगोरे उलगडता येतात . किती वेगळं आणि विशेष आहे हे शास्त्र , नाही का? त्याचा सगळ्यात जास्ती उपयोग कोणाला होऊ शकतो तर तो मुलांना आणि त्यायोगे पालकांना !!! खास या विषयात करियर केलेल्या, त्यातल्या अनेक शाखांचा सखोल अभ्यास करून त्यामाध्यमातून या आगळ्यावेगळ्या क्षेत्राची लोकांना माहिती मिळावी या उद्देशाने स्वतःची एक संस्था सुरु करणाऱ्या एका dynamic आणि enthusiastic ग्रॅफोलॉजीस्ट आणि handwriting expert ला आज मी घेऊन आलेय !!! Srujan graphological solutions & coaching centre चा founder, आदित्य ओक !!! आदित्य प्रोफेशनल ग्रॅफोलॉजीस्ट आणि questioned documents analyst म्हणून गेली अनेक वर्ष काम करतोय; त्याने स्वतः तयार केलेल्या वेगवेगळ्या मॉड्युल्स च्या आधारे तो personality profiling consultation सुद्धा करतो ज्याचा उपयोग करियर गायडन्स , कॉर्पोरेट रिक्रुटमेंट , स्पोर्ट्स स्पेसिफिक अससेसमेंट अशा अनेक बाबतीत होऊ शकतो !! आहे ना खूपच इंटरेस्टिंग ...चला तर मग जाणून घेऊया या हटके पण खूप insightful आणि अर्थात मुलांना जाणून -समजून घेण्याचा वेगळा दृष्टिकोन देणाऱ्या क्षेत्राविषयी आदित्याकडून. 

Dec 12, 202137:39
"सुजाण पालकाच्या लेखणीतून" with Dr. Amit Bidwe [Orthopaedic Surgeon & An Author] - Ep. 15

"सुजाण पालकाच्या लेखणीतून" with Dr. Amit Bidwe [Orthopaedic Surgeon & An Author] - Ep. 15

तुम्ही कधी राग न आवरून मुलांना मारलंय का ? नंतर त्यांचे केविलवाणे चेहेरे आठवून आणि रडण्याचे आवाज कानात घुमून ; तुम्हाला प्रचंड guilt आलाय का ? एखाद्या गोष्टीसाठी मुलांना बोलून, त्यांच्यावर चिडून झाल्यावर नंतर त्यात त्यांची काहीच चूक नव्हती आपण उगाच बोललो असा पश्चाताप तुम्ही अनुभवलाय का? मुलं आपलं ऐकत नाहीत अशी तुमची तक्रार असते का ? मुलं अचानक मोठी झालीयेत असा साक्षात्कार तुम्हालाही झालाय का? मग हे नक्की ऐका ... "सुजाण पालकाच्या लेखणीतून ..." - व्यवसायाने प्रथितयश ऑर्थोपेडिक डॉक्टर, ४ वेगवेगळ्या पुस्तकांचे लेखक, हौशी फोटोग्राफर आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःचं पालकत्व अतिशय संवेदनशीलपणे जगणारे आणि त्यात येत गेलेले अनुभव खूप तरलपणे शब्दांत मांडणारे; डॉ. अमित बिडवे !!! जाणून घेऊया,त्यांच्या पालकत्वाच्या प्रवासातले हे अनुभव..त्यांच्याच शब्दांत आणि सादर करतीये माझ्या आवाजात...तुमची होस्ट, शिल्पा !!! 

डॉ अमितसारखेच तुमचेही काही अनुभव असतील , तुम्हालाही तुमचं स्वतःचं असं काही शेयर करावंसं वाटत असेल तर मला नक्की कळवा !!

Nov 30, 202110:39
Encouraging Endorsements series- 5. Leena Paranjpe [India's only Millennial Marriage Coach]

Encouraging Endorsements series- 5. Leena Paranjpe [India's only Millennial Marriage Coach]

"Selfless Parenting" या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आपल्या आमंत्रित पाहुण्यांना , मित्र-मैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं ? याविषयी !!! तुम्ही देखील तुमच्या ध्वनिमुद्रित प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ आम्हाला shini3015@gmail.com वर mail करा... निवडक  feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी दिली जाईल !!! वाट बघतीये तुमच्या प्रतिसादाची , नक्की पाठवा. Appreciation always appreciated !!!

Nov 26, 202101:29
"बा का रं का" - A special Toy-kit by Swaarka [स्वार्क] with Chaitrali Rahalkar - Ep.14

"बा का रं का" - A special Toy-kit by Swaarka [स्वार्क] with Chaitrali Rahalkar - Ep.14

कोरोनाच्या कठीण काळात ज्या काही अडचणींचा सामना आपण केला आणि करतो आहोत त्यामध्ये प्रामुख्याने "screen addiction " ही फारच गंभीर समस्या आहे आणि त्याचे दुष्परिणाम काय असतात हे आपण आधीही मुक्ता ताईकडून जाणून घेतलं होतं . समस्या आहे; मुलांच्या दृष्टीने तर अगदी काळजीचीच बाब आहे; हे तर कळतंय पण नेमकं कसं बाहेर काढायचं मुलांना यातून? , काय पर्याय आहेत ? त्यातही मुलं लगेच बोअर होतात मग काय करायचं ? खेळण्यांवर इतका खर्च करायचा आणि ते एकदोनदा खेळून मुलं सोडून देतात आणि घरात फक्त अडगळ आणि पसाऱ्याला कहार होतो नाही का ? डोन्ट वरी मंडळी आपल्या या मराठी पॉडकास्ट मध्ये मी तुमची होस्ट शिल्पा, आज या सगळ्यांवर सोल्युशन काढलेल्या आणि मुलां- पालकांसाठी वेगवेगळ्या उपक्रमांमधून काम करणाऱ्या, एका संस्थेच्या एकदम हटके आणि तितक्याच उपयुक्त अशा; एका खास मुलांसाठी बनवलेल्या खूप छान "toykit " ज्याला ते "बा का रं का" असं म्हणतात त्या विषयी माहिती द्यायला माझ्या एका मैत्रिणीला घेऊन आलेय !! संस्थेचं नाव आहे "स्वार्क " आणि मैत्रीण जी या संस्थेची co founder आहे ती आहे चैत्राली रहाळकर !!! चैत्राली आज सगळ्या पालकांचा मोठा प्रश्न सोडवायला आणि तिच्या संस्थेच्या या आगळ्यावेगळ्या नवीन उपक्रमाविषयी विषयी माहिती द्यायला खास आलीये; तर जाणून घेऊया काय आहे या "स्वार्क " च्या पोटलीत !!!

Nov 12, 202124:06
"पुस्तक परिचय" - by Prasad Manerikar [Founder, Anubhutee Knowledge & Research Foundation, Pune ] Ep.13

"पुस्तक परिचय" - by Prasad Manerikar [Founder, Anubhutee Knowledge & Research Foundation, Pune ] Ep.13

बरेच दिवसांनी परत एकदा "पुस्तक परिचय " घेऊन येतेय !! पण या वेळेस तो करून देणारेत त्याच पुस्तकाचा लेखक म्हणून एक भाग असणारे तसंच गेली १५ वर्ष शिक्षण क्षेत्रात; त्यातही प्रायोगिक शिक्षणात नवनवे प्रयोग करणारे आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे community based learning च्या आधारावर स्थापन केलेल्या अनुभूती नॉलेज अँड रिसर्च फाऊंडेशन या संस्थेचे संस्थापक "प्रसाद मणेरीकर" अर्थात प्रसाद दादा. बालकेंद्री शास्त्रशुद्ध शिक्षण पद्धतीच्या विकसनासाठी सुद्धा प्रसाद दादा कार्यरत आहेत. ग्राममंगल या प्रयोगशील शिक्षण संस्थेसोबत अनेक शैक्षणिक प्रयोग आणि पालक-शिक्षक कार्यशाळा घेतलेल्या प्रसाद दादांनी लहान मुलांसाठी काही पुस्तकांचं लेखनही केलंय !!! तर अशा बहूआयामी व्यक्तिमत्वाकडून पालकांसाठी अतिशय उपयुक्त अशा; "अधिक सुजाण पालकत्वासाठी पालकशाळा" या मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाचं विवेचन आज आपण करणार आहोत , चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला , ऐकूया प्रसाद दादा काय सांगताहेत या पुस्तकाच्या अंतरंगाविषयी ?!!

Oct 31, 202113:53
Embracing Fatherhood with Sukirt Gumaste [Publishing Manager-Storytel] Ep. 12

Embracing Fatherhood with Sukirt Gumaste [Publishing Manager-Storytel] Ep. 12

मूल जन्माला येणार, असं कळता क्षणी बरेचदा सगळा फोकस आईकडे जातो! तिला खूप जपलं जातं, विचारपूस केली जाते, हवं नको बघितलं जातं; जे अर्थातच योग्य च आहे पण या सगळ्यात होणाऱ्या, होऊ घातलेल्या किंवा नुकत्याच झालेल्या बाबा चं काय ?!! त्याला काय वाटतं? तो काय विचार करतो? त्याची भूमिका काय? त्याला काय challenges जाणवतात? या पूर्ण प्रवासाचा तो मूक साक्षीदार च बनतो अनेकदा, हो ना? खरं तर त्याचीही बाजू खूप महत्त्वाची असते पण ती सांगितली, ऐकली नाही जात सहसा... बाबाचा "हळवा कोपरा" बरेचदा दृष्टीआड च राहतो.. आणि त्याची कहाणी मनातच राहते.. तीच उलगडणार आहोत आणि तो कोपरा जाणून घेणार आहोत एका multi talented आणि नुकत्याच झालेल्या बाबा कडून !!! सुकिर्त गुमास्ते !!! Storytel हे नाव आपल्या सगळ्यांनाच सुपरिचित आहे ; तिथेच पब्लिशिंग मॅनेजर म्हणून गेली ५ वर्ष तो काम बघतोय. स्टोरीटेल च्या मराठी ओरिजिनल्स या सेगमेंट च्या under त्याने आजवर जवळजवळ २५ ऑडिओ नॉव्हेल्स, ५ पॉडकास्ट shows आणि ४० शॉर्ट stories produce केल्या आहेत !! मराठी youtube चॅनेल चा तो co founder आहे ज्यात तो ट्रॅव्हल ब्लॉगिंग करतो mass communication आणि journalism मध्ये पोस्ट graduation केल्यावर त्याने अनेक नामवंत वृत्तपत्रांसाठी ८ वर्ष पत्रकारिता देखील केलीये त्याचबरोबर मराठी समांतर रंगभूमीशी सुद्धा तो गेली १५ वर्ष जोडलेला आहे !! तर अशा या enthusiastic , energetic, empathetic आणि entry level बाबा शी आज गप्पा मारणार आहोत त्याच्या या नव्याने निभावत असलेल्या रोल बाबत Embracing Fatherhood या आपल्या आजच्या एपिसोड मध्ये !!!

Oct 24, 202142:49
स्विकारूया समलैंगिकतेला !!! with Sameer Samudra & Amit Gokhale- [LGBTQ Activists] - Ep.11

स्विकारूया समलैंगिकतेला !!! with Sameer Samudra & Amit Gokhale- [LGBTQ Activists] - Ep.11

Selfless Parenting या आपल्या मराठी पॉडकास्ट च्या नवीन season ची सुरुवात एका अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील विषयाने करतीये जो आपल्याकडे कधीच बोलला आणि हाताळला जात नाही ... आणि केवळ त्या विषयी असणाऱ्या गैरसमज , आकस आणि नकारात्मकता यामुळे आजवर अनेक मुलंमुली भरडली गेली आहेत ; जात आहेत. आपलं मूल वयात येणार हे प्रत्येकच पालकाला माहिती असतं पण त्याचं "sexual orientation" काय असणारे? हे आपण ठरवू शकत नाही; ते निसर्गाने च ठरवलेलं असतं आणि ते जसं असेल त्या प्रमाणे त्याला किंवा तिला जगण्याचा पूर्ण अधिकार आहे या गोष्टीचा acceptance प्रत्येकाला असणं गरजेचं आहे.. जो दुर्दैवाने आपल्या समाजातल्या काही घटकांच्या बाबतीत अजिबात नाहीये! हो,"समलैंगिकता " !!! जी खरं तर अतिशय "normal " आहे. ह्या विषयी कमालीची उदासीनता आणि तिरस्कार आहे आपल्याकडे . असं मूल अगदी कोणाच्याही घरात जन्माला येऊ शकतं; म्हणूनच त्याविषयी मुला- पालकांना योग्य अशी माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच उद्देशाने मी घेऊन येतेय एका खूप humble आणि sensible "gay couple " ला ज्यांच्या अनुभवांचे बोल आपल्या सगळ्यांसाठी real eye opener ठरतील !!! समीर समुद्र आणि अमित गोखले !!! LGBTQ community साठी activists म्हणून काम करणाऱ्या , अशा मुला- पालकांच्या मदतीसाठी कायम तत्पर असणाऱ्या, एक माणूस म्हणूनही ज्यांचा खरोखरी अभिमान वाटवा अशा या २ व्यक्तिमत्त्वांच्या प्रवासाविषयी आपण जाणून घेणार आहोत. एक सजग पालक होण्याच्या दृष्टीने या बाबत जाणून घेणं, तो awareness असणं आणि त्याविषयी खरी माहिती बाळगणं ही आपली जबाबदारी आहे असं मला वाटतं. 

नक्की ऐकाल , समजून घ्याल आणि जास्तीतजास्त share कराल हा आपला एपिसोड अशी आशा आहे !!! "स्विकारुया समलैंगिकतेला" 

Oct 17, 202151:29
How to make your"SELF" Happy?!! Ep.- 10 [Small yet Special Milestone] with Shubhangi Khasnis.

How to make your"SELF" Happy?!! Ep.- 10 [Small yet Special Milestone] with Shubhangi Khasnis.

पालकत्वाविषयीच्या अनेक चुकीच्या धारणा वर्षानुवर्षं आपल्याकडे चालत आल्या आहेत आणि त्यात आपण आणि आपली मुलं भरडून निघाली आहेत ... पालक म्हणून वावरताना आपण किती वेळा ती जबाबदारी खरंच जबाबदारीने निभावतो?जेव्हा मी एक मूल जन्माला घालायचं ठरवतो तेव्हा जास्तीत जास्त "financial planning " चा विचार केला जातो पण mental planning चं काय ?? मेख अशी आहे की आपण बदल नेहमी समोरच्यांकडून expect करतो पण मला बदलायची गरज आहे , माझ्या विचारांवर विचार करण्याची गरज आहे , फोकस स्वतःकडे वळवण्याची गरज आहे हेच आपण सोयीस्करपणे विसरतो, नाही का ? आपल्याला कोणी आरसा दाखवलेला आपल्याला अजिबात चालत नाही !!! करतो ना असंच आणि याहीपेक्षा बरंच काही ??? मग आज ऐकाच हा interview !!! एकदा बघाच स्वतःकडे अशा पद्धतीने ... आपण स्वतःबद्दल काय विचार करतो ? आपण स्वतःला आवडलेलो असणं का महत्वाचं असतं ? स्वतःला स्विकारलं नसेल तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? आपण मुखवटे चढवून वावरतो तेव्हा आपल्या "स्व" ची काय अवस्था होते ? या सगळ्या विषयी अगदी सखोल चर्चा आज मी करणारे ज्यांनी मला आरसा दाखवला आणि माझा फोकस बदलला अशा माझ्या गुरु शुभांगी खासनीस यांच्यासोबत !!!

आपल्या 'सेल्फलेस पेरेंटिंग ' च्या छोट्याशा का असेना पण १० व्या milestone एपिसोड च्या निमित्ताने "सेल्फ" या अतिशय महत्वाच्या parenting च्या aspect वर मार्गदर्शन करायला आपले गुरूच पाहुणे म्हणून लाभणं यापेक्षा चांगलं काय असू शकतं ?? ज्यांनी माझी स्व-प्रतिमा बदलली त्यांच्याप्रती gratitude व्यक्त करण्याचा आणि त्यांनी मला शिकवलेलं तुम्हा सगळ्यांपर्यंत त्यांच्याच मार्फत पोचवण्याचा माझा हा एक छोटासा प्रयत्न !!! नक्की ऐका आणि कसा वाटला ते जरूर कळवा !!!

Sep 30, 202144:09
Encouraging Endorsements series- 4. Abha Bhagwat

Encouraging Endorsements series- 4. Abha Bhagwat

"Selfless Parenting" या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आपल्या आमंत्रित पाहुण्यांना , मित्र-मैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं ? याविषयी !!! तुम्ही देखील तुमच्या ध्वनिमुद्रित प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ आम्हाला shini3015@gmail.com वर mail करा... निवडक feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी दिली जाईल !!! वाट बघतीये तुमच्या प्रतिसादाची , नक्की पाठवा. Appreciation always appreciated !!!

Sep 25, 202101:40
Encouraging Endorsements series- 3.Anuja Kulkarni

Encouraging Endorsements series- 3.Anuja Kulkarni

"Selfless Parenting" या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आपल्या आमंत्रित पाहुण्यांना , मित्र-मैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं ? याविषयी !!! तुम्ही देखील तुमच्या ध्वनिमुद्रित प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ आम्हाला shini3015@gmail.com वर mail करा... निवडक feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी दिली जाईल !!! वाट बघतीये तुमच्या प्रतिसादाची , नक्की पाठवा. Appreciation always appreciated !!!

Sep 22, 202101:50
Encouraging Endorsements series- 2. Dr.Shruti Panse

Encouraging Endorsements series- 2. Dr.Shruti Panse

"Selfless Parenting" या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आपल्या आमंत्रित पाहुण्यांना , मित्र-मैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं ? याविषयी !!! तुम्ही देखील तुमच्या ध्वनिमुद्रित प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ आम्हाला shini3015@gmail.com वर mail करा... निवडक feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी दिली जाईल !!! वाट बघतीये तुमच्या प्रतिसादाची , नक्की पाठवा. Appreciation always appreciated !!!

Sep 12, 202102:50
Encouraging Endorsements Series- 1. Savaniee Ravindrra

Encouraging Endorsements Series- 1. Savaniee Ravindrra

"Selfless Parenting" या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आपल्या आमंत्रित पाहुण्यांना , मित्र-मैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं ? याविषयी !!! तुम्ही देखील तुमच्या ध्वनिमुद्रित प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ आम्हाला shini3015@gmail.com वर mail करा... निवडक feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी दिली जाईल !!! वाट बघतीये तुमच्या प्रतिसादाची , नक्की पाठवा. Appreciation always appreciated !!!

Sep 08, 202102:24
शिकणं, शिक्षण आणि पद्धती- सुषमा पाध्ये Ep. 9

शिकणं, शिक्षण आणि पद्धती- सुषमा पाध्ये Ep. 9

शिकणं म्हणजे काय ? मूल कसं शिकतं ? शिक्षण घेणं किंवा देणं या प्रक्रिया कशा असतात आणि कशा असाव्यात ? शिक्षणाची योग्य पद्धत कशी असावी ? अभ्यासाच्या ताणाचं नियोजन कसं करावं ? National Education Policy (NEP) मध्ये नक्की काय अपेक्षित आहे? शिक्षणाच्या वेगवेगळ्या पर्यायी व्यवस्था कोणत्या आणि त्या कशा पद्धतीने काम करतात ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी; त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्याविषयी शास्त्रशुद्ध माहिती देण्यासाठी घेऊन येतेय; बालशिक्षण क्षेत्रात गेली अनेक वर्ष सखोल अभ्यास करून आशयविकसित करणाऱ्या , "सहज आणि मेंदू आधारित शिक्षण" या खूप महत्वाच्या विषयाची कास धरून सतत प्रयोगशील असणाऱ्या आणि त्यावर आधारित साहित्य-साधनांची ची निर्मिती करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञ सुषमा ताई अर्थात सुषमा पाध्ये यांना !!! शिक्षक दिनाचं औचित्य साधून "शिकणं , शिक्षण आणि पद्धती" या त्रिसूत्री वर आधारीत असा अतिशय महत्वाचा विषय हाताळणारा आजचा आपला भाग आहे आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेली व्यक्ती देखील एक हाडाची शिक्षिका च असणं हा दुग्धशर्करायोग आहे !!! आवर्जून ऐका आणि शेयर करायला विसरू नका..

Sep 05, 202145:03
चला "मुक्त" होऊया !!! Ep.8 - with Mukta Puntambekar

चला "मुक्त" होऊया !!! Ep.8 - with Mukta Puntambekar

ADDICTION हा सध्या सगळ्यांच्याच काळजीचा बनत चाललेला विषय झालाय मग ते drinks असोत, drugs असोत की screen ... अडकत चाललोय हे कळतं पण बाहेर कसं पडायचं हेच कळत नाहीये हो ना? आणि दिवसेंदिवस हा प्रश्न गंभीर च बनतोय असंही वाटतं, म्हणूनच त्यातले धोके समजून घेणं , त्यावर उपाय काय ? त्यांना कसं tackle करता येईल, त्यातून बाहेर कसं पडावं ? आणि सर्वांत महत्वाचं मुलांना म्हणजेच पुढच्या पिढीला यापासून परावृत्त कसं करता येईल ? या अतिशय महत्वाच्या विषयांवर Selfless parenting च्या माध्यमातून मी तुमची होस्ट शिल्पा आज मुक्ताताईंबरोबर यावर चर्चा करणार आहे आणि मला खात्री आहे आपल्याला यातून नक्कीच चांगलं मार्गदर्शन मिळेल !!! आपल्या समाजाप्रती असलेल्या देण्याची जाणीव जेव्हा खूप तीव्र असते , त्यातून जेव्हा स्वयंप्रेरणेने काम करण्याची उर्मी येते आणि त्यासाठी आपलं आयुष्य देण्याची तयारी असते तेव्हाच त्यातून असामान्य कामगिरी केली जाते !!! पुण्यात अशा अनेक असामी तयार झाल्या आणि अजूनही आहेत याचा सार्थ अभिमान ज्यांच्यामुळे आपण बाळगू शकतो अशा व्यक्तींपैकी एक आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभली आहे , ती म्हणजे मुक्ता ताई अर्थात मुक्ता पुणतांबेकर !!! मुक्ता ताईंनी स्वतः क्लिनिकल सायकॉलॉजि मध्ये डॉक्टरेट केलेलं आहे आणि गेली २७ वर्ष ती मुक्तांगण मध्ये एक कौन्सेलर ते संचालिका या पद्धतीने काम बघत आहे. community based rehabilitation & prevention यावर आधारित अनेक प्रोग्रॅम्स आणि वर्कशॉप्स देखील ती घेते. त्याचबरोबर अनेक वृत्तपत्र आणि मासिकांमधून या विषयांवर लेखनही करत असते. मुक्तांगणच्या या उदात्त कार्याला खरंच सलाम !!! चला व्यक्त होऊया आणि मुक्त होऊया !!! 

Aug 20, 202153:09
Happy Parenting starts with a Happy Marriage !!! Ep. 7 with Leena Paranjpe

Happy Parenting starts with a Happy Marriage !!! Ep. 7 with Leena Paranjpe

Selfless Parenting is happy to present this new theme based episode that gives a different perspective to Conscious PARENTING !!! Do LISTEN. 

आपल्या Selfless Parenting या मराठी पॉडकास्ट वर मी शिल्पा आज एका खूप वेगळ्या अँगल ने पालकत्वाकडे बघण्याचा प्रयत्न करण्यासाठी एक वेगळी theme घेऊन तुमच्यासमोर आलीये !!! "Happy parenting starts with a happy marriage" ...असा कधी विचार करतो का आपण ? की माझ्या पेरेंटिंग वर या गोष्टीचा किती परिणाम होत असेल ? काय संबंध आहे लग्न आणि पालकत्व यांचा परस्परांशी ? आणि असेल तर तो कसा ? खरं सांगायचं तर हा aspect प्रचंड महत्वाचा आहे एक उत्तम आणि सुजाण पालक होण्यासाठी... कसं ? त्यासाठीच तर हा प्रपंच !! या अशा अनोख्या एपिसोड साठी; खूप अनोख्या पद्धतीने या विषयावर काम करणाऱ्या एका व्यक्तीला, तुम्हाला भेटायला घेऊन आलीये !!

India's FIRST "Millennial Marriage Coach" and so the sensible parent .. लीना परांजपे !!! Millennial marriage coach म्हणून गेली अनेक वर्ष त्या उत्तम काम करताहेत . detox your marriage या नावाचं पुस्तकही त्यांनी लिहिलंय शिवाय Cementing wedding with marriage या अफलातून संकल्पनेवर आधारित अनेक workshops आणि एक पॉडकास्ट सुद्धा त्या चालवतात !!! आज आम्ही एकत्र आलोय ते happy marriage कडून happy parenting च्या प्रवासाकडे कसं जात येईल ? या खूप महत्वाच्या अनुषंगाने पालकत्वाकडे बघण्यासाठी. मी प्रचंड उत्सुक आहे ते जाणून घ्यायला आणि मला खात्री आहे तुम्हीही तितकेच असाल !! ऐकुया तर मग आजचा एपिसोड काय घेऊन आलाय आपल्यासाठी !!!

Aug 02, 202152:07
Uncommon Upbringing - Abha Bhagwat Ep.6

Uncommon Upbringing - Abha Bhagwat Ep.6

Parent's Day Special Episode on "Uncommon Upbringing" with Abha Bhagwat !!! "रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ... " हे वाक्य अर्थार्थी जिच्याबद्दल खरं ठरलंय असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही ; अशी अत्यंत मितभाषी आणि तितकीच खंबीर असणारी; "रंगजा " च्या माध्यमातून आपल्या पुण्यनगरीतल्या अनेक बेरंगी आणि जुन्या भिंतींवर रंगांचा साज चढवून त्यांचा कायापालट करण्याचा ध्यास घेतलेली " आभा ताई " अर्थात आभा भागवत आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे !!! सुप्रसिद्ध भित्तिचित्रकार आणि रंगजा या संस्थेची संस्थापक तसंच शोभाताई आणि अनिल भागवतांची मुलगी म्हणून आभा भागवत हे नाव बहुश्रुत आहेच पण आज आपल्या Selfless Parenting च्या माध्यमातून , तिच्या एका वेगळ्या छटेची ओळख तुम्हा सगळ्यांना आपल्या पॉडकास्ट च्या आजच्या भागातून करून देणारे...तिच्या मधल्या सुजाण आणि संवेदनशील पालकाची !!! ती करत असलेल्या तिच्या मुलांच्या "uncommon upbringing " ची !!! आभा ताई एक पालक म्हणून का वेगळी आहे? ते आज आपल्या या मुलाखतीतून उलगडणार आहे. हे नेमकं काय वेगळेपण आहे ते जाणून घ्यायला उत्सुक आहात ना ? चला तर मग जाणून घेऊया तिच्याच कडून. सादर आहे, Parent's Day च्या खास निमित्ताने एका खास पालकाची अर्थात आभाताईची पालकत्वावरची पहिलीवहिली मुलाखत !!! 


Jul 25, 202144:00
Psyche of Parenting - Anuja Kulkarni Ep.5

Psyche of Parenting - Anuja Kulkarni Ep.5

आताच्या काळात बरेच पालक 'कौन्सेलिंग' विषयी बऱ्यापैकी सजग होऊ लागले आहेत किंवा cautious झाले आहेत. पण नेमकं करायचं काय ? वागायचं कसं ? चुकतंय कळतंय पण सुधारायचं कसं ? असे बरेच साशंक असलेले पालक आजुबाजूला पाहायला मिळतात . बरेचदा मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याची वेळ आलीये हेच लक्षात येत नाही ... चुकांवर चुका होत राहतात ; कळतं पण वळत नाही, असं होतं आणि मग पश्चातापाची वेळ येऊ शकते . होतं ना असंच काहीसं ..?! मी शिल्पा, आपल्या या मराठी पॉडकास्ट मध्ये आज या सगळ्यावरची उत्तरं मिळवण्यासाठी एका खूप छान , हसऱ्या आणि फ्रेंडली व्यक्तिमत्वाला घेऊन आलीये !!! अनुजा कुलकर्णी - जिज्ञासा असेसमेंट & कौन्सेलिंग या संस्थेची ती co founder आहे . अनुजा जवळ जवळ गेली ८ वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहे. ती क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करते . तसंच अनेक शाळा आणि कॉरपोरेट क्षेत्रातही अनुजाने आजपर्यंत उत्तम काम केलंय . सध्या ती parenting styles & behavioural issues of pre schoolers या विषयावर Phd देखील करतीये . आणखी खूप महत्वाचं म्हणजे जिज्ञासा चा एक युट्यूब चॅनेलही ती चालवते ; जो आपल्यासारख्या पालकांसाठी खूप महत्वाच्या विषयांवर माहितीपूर्ण ठरणारा आहे. चला तर मग जाणून घेऊया अनुजा कडून , what Psychology says about PARENTING ?!!! 

Jul 12, 202159:07
EP.4 - " पुस्तक परिचय " !!

EP.4 - " पुस्तक परिचय " !!

तुमच्या मुलांना भीती वाटते का ? तुमची मुलं हट्टीपणा करतात का ? तुमच्या मुलांना राग येतो का? तुम्हाला तुमच्या मुलांशी नेमका कसा संवाद साधायचा असा प्रश्न पडतो का ? त्यांच्या शालेय जीवनाबद्दल काळजी वाटते का ? या सगळ्यांची उत्तरं जर हो अशी असतील तर हे सदर तुमच्याच साठी आहे !!! पालकत्वा विषयी चौफेर माहिती तुम्हा सगळ्यांसाठी एकाच ठिकाणी उपलब्ध असावी या प्रामाणिक हेतूने आज पुन्हा एक नवा प्रयोग करायचा असं ठरवलं . आपण बरेचदा या विषयावरची खूप पुस्तकं बघत असतो , कधी वाचली जातात तर कधी वाचायची ठरवून विसरली जातात.. कधीकधी त्यात नेमकं काय आहे आणि ते आपल्याला खरंच उपयोगी पडणारे का ? हे नीट माहिती नसतं . अनेकदा तर बरीच चांगली पुस्तकं माहितीही नसतात. इच्छा तर असते पण वेळ नसतो .... एक ना अनेक . याच साठी हा एक मदतीचा हात देण्याचा छोटासा प्रयत्न . एक नवीन सदर जे अधून मधून तुमच्या भेटीला येत राहणार आहे ," पुस्तक परिचय "!!! अर्थातच आपल्या विषयाशी निगडीत असलेल्या !! मग त्यात आपल्याला काय भावलं , content काय आहे ? त्यातल्या काही भागाचं वाचन , त्यामधून आपल्याला काय मिळालं ? त्या पुस्तकाशी निगडित एखादी आठवण , त्याचे लेखक, प्रकाशक यांचे तपशील अशा गोष्टींचा समावेश असेल.

या सदराची सुरुवात मी मला खूप आवडलेल्या आणि माझ्या आवडत्या लेखिकेच्या एका पुस्तकाने करणारे !!! कोणतं ? पुस्तकाचं नाव आहे, अशी का वागतात मुलं ? उन्मेष प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं , डॉ. श्रुती पानसे यांचं हे पुस्तक आहे . शंभर च पानांचं पण शंभर नंबरी पुस्तक आहे हे !!! याच पुस्तकाचे अंतरंग उलगडून दाखवले आहेत आजच्या आपल्या "पुस्तक परिचय" या नवीन सदराच्या आजच्या भागात , नक्की ऐका आणि आवर्जून हे पुस्तक वाचा !!! 

Jul 01, 202110:13
Parent To Be Episode with Savaniee Ravindrra ( National Award winning Playback Singer ) Ep.3

Parent To Be Episode with Savaniee Ravindrra ( National Award winning Playback Singer ) Ep.3

पालकत्वाचा प्रवास हा एखादं जोडपं आईबाबा होणार हे कळल्यावरच सुरु होतो आणि हाच विचार मनात ठेऊन would be parent चा interview घ्यायचा असं मनात होतं . त्यासाठी जेव्हा सावनी ला विचारलं तेव्हा तिने क्षणात होकार दिला !! मला वाटतं हिच positive parenting ची सुरुवात आहे .आज एका कलाकार आणि "would be parent " ला तुम्हा सगळ्यांच्या भेटीला घेऊन आलेय . नुकत्याच पार पडलेल्या ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात जिला सर्वोत्कृष्ट पार्श्व गायिका म्हणून सन्मानित करण्यात आलं आणि आपल्याला वेगवेगळ्या कार्यक्रमातून तिच्या सुरेल आणि सुंदर स्वराविष्कारांतून आनंद देणारी, अतिशय गोड आवाजाची आणि तितक्याच गोड स्वभावाची आपली सगळ्यांची आवडती गायिका " सावनी रवींद्र " !!! तिचा एक प्रतिथयश गायिका म्हणून सुरु असलेला यशस्वी प्रवास आपण पाहतोच आहोत पण आता ती वैयक्तिक आयुष्यात एका वेगळ्या प्रवासाचीही सुरुवात करतीये... आईपणाची !! आज एक वेगळी सावनी सापडणार आहे आपल्याला या मुलाखतीतून ... चला तर मग जाणून घेऊया तिच्या या प्रवासाविषयी तिच्याकडून आपल्या selfless parenting या मराठी पॉडकास्ट च्या आजच्या भागात !!!

Jun 19, 202130:49
आईपण पेलताना...from the Heart of the Host !!! Ep.2

आईपण पेलताना...from the Heart of the Host !!! Ep.2

Selfless Parenting या आपल्या मराठी पॉडकास्ट मध्ये मी तुमची होस्ट शिल्पा, आज तुमच्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन आलेय. काय? काहीतरी माझ्या मनातलं , माझ्या स्वतःच्या अनुभवातून आलेलं ... माझ्या च शब्दांत आणि माझ्याच आवाजात !!! नव्याने झालेल्या , होऊ घातलेल्या किंवा होण्याचा विचार करणाऱ्या माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी खास... आई होण्यापूर्वी आपल्याला दाखवलं जाणारं चित्र आणि नंतर प्रत्यक्ष अनुभवताना दिसणारं चित्र यातला फरक नीट कळावा आणि ते समर्थपणे पेलता यावं म्हणून हा प्रयत्न...माझे अनुभवाचे बोल !!

माझ्या या पॉडकास्ट वर माझं स्वतः च असं काहीतरी sharing असावं असं आधीपासूनच मनात होतं ..तेच मूर्त स्वरूपात आणायचा प्रयत्न याद्वारे करतीये .. from the heart of the host ... " आईपण पेलताना " बघा कसा वाटतोय ? कळवायला विसरू नका.. प्रतिक्रियांची वाट बघतीये !!! HAPPY PARENTING !!! 

- शिल्पा. 

Jun 09, 202108:12
Selfless Parenting - Myths of Parenting with Dr. Shruti Panse- Ep. 1

Selfless Parenting - Myths of Parenting with Dr. Shruti Panse- Ep. 1

पेरेंटिंग च्या प्रवासात आपल्याला अनेक प्रश्न पडत असतात. आदर्श पालक होण्याच्या नादात आपण बरेचदा चुकीचा च मार्ग अवलंबतो असं कधी जाणवलंय का तुम्हाला ? मुळात "परफेक्ट पेरेंट " अशी संकल्पना खरंच असते का अस्तित्वात ? कळतं पण वळत नाही अशी अवस्था होते ना बरेचदा ? क्वालिटी टाइम म्हणजे नेमका काय ? पेरेंटिंग च्या कुठल्या ट्रेट्स मध्ये आपण येतो ? या आणि अशाच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी, आज माझ्या पॉडकास्ट मध्ये एका खूप अनुभवी आणि तितक्याच down to earth व्यक्तिमत्वाला तुम्हाला भेटण्यासाठी घेऊन आलेय . ज्यांचे पालकत्वाविषयीचे धडे गिरवत माझा पालकत्वाचा प्रवास सुकर झाला अशा " डॉ. श्रुती पानसे " !!! मराठीतून एम ए आणि ब्रेन डेव्हलपमेंट या विषयावर पीएचडी केलेल्या श्रुतीताईंनी अनेक वृत्तपत्रांमध्ये या विषयांवर लेख लिहिले आहेत. जवळ जवळ १९ पुस्तकांचं लेखन हि त्यांनी केलंय आणि चिकूपिकू या मुलांमध्ये खूप लोकप्रिय झालेल्या मासिकाच्या त्या संपादक आहेत. या विषयांवर त्यांनी अनेक कार्यशाळाही घेतल्या आहेत. तर ऐकताय ना ,मग या बहुरंगी व्यक्तिमत्वाची मी घेतलेली मुलाखत !! हा अजाण ते सुजाण पालकत्वाचा प्रवास श्रुती ताईंसारख्या अनुभवी व्यक्तींमुळे खूप सुखावह होईल यात शंकाच नाही !!  पुन्हा भेटूया, लवकरच एका नवीन एपिसोड मध्ये , तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा !!!


May 24, 202129:03
Gratitude Episode

Gratitude Episode

Trailer एपिसोड ला भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार !!! तुमचं प्रेम , सदिच्छा अशाच पाठीशी असुद्या . आज तुमच्या समोर एक नवीन संकल्पना घेऊन येतेय ...

जेव्हा पॉडकास्टींग हे नवं क्षेत्र explore करायचं ठरवलं तेव्हा खूप विचारांती पालकत्व हा विषय निवडला. पहिल्या एपिसोड चा जेव्हा विचार सुरु झाला, तेव्हा अचानक एक कल्पना सुचली की पालकत्वाविषयी तज्ज्ञांची मतं आपण नेहमीच ऐकतो पण आपलं पालकत्व ज्यांनी लीलया पेललं त्या आपल्या आई बाबांनाच आपल्या या नवीन प्रवासाचा श्रीगणेशा करायला बोलावलं तर ... येस्स ठरवलंच मग !!! निमित्त ही तितकंच खास होतं .. त्यांच्या लग्नाचा ४० वा वाढदिवस !!! 

मग ऐकताय ना ,मी माझ्या आई बाबंचीच घेतलेली त्यांच्या parenting च्या प्रवासाची मुलाखत ... माझा पहिला GRATITUDE एपिसोड !!

May 11, 202112:38
Trailer Episode

Trailer Episode

पालकत्व हे रोज नव्याने उलगडणारं , उमजणारं ,समजणारं; खूप वेगवेगळे अनुभव देणारं , तर कधी कधी त्रस्त करणारं , काळजी वाढवणारं , खूप दमवणारं आणि कसोटी पाहणारं सुद्धा असतं नाही का? सध्याचा काळ तर या बाबतीत अगदी तसाच आहे.म्हणूनच स्वानुभवातून आणि बरेच दिवसांपासून या विषयावर काम करण्याच्या तळमळीतून आपला हा podcast जन्माला आलाय !! इथे तुम्हाला पालकत्वाविषयी अनेक तज्ञ व्यक्तींचे; पालकत्वाच्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांवरचे interviews, tips , parenting वरील उपयुक्त पुस्तकांची माहिती , वेगळ्या आणि अनोख्या पद्धतीने मुलांना वाढवलेल्या काही पालकांचे अनुभव , मुलांबरोबर आणि मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींविषयी माहिती आणि आणखीनही बरंच काही असणारे !!!

in short , one stop solution for all your parenting concerns and needs !!! चला तर मग, सुरु करूया, 'प्रवास अजाण ते सुजाण पालकत्वाचा !!!' नक्की ऐका आणि follow करा माझ्या selfless parenting या मराठी पॉडकास्टला :)  

May 06, 202103:47