Skip to main content
StreeLok

StreeLok

By Namrata Bhingarde

StreeLok is the first Marathi podcast that talks about things your mom never told you about menstrual health. Ignorance around women’s menstrual health is abound. Lack of education and deep-rooted cultural factors have kept the subject out of public discourse. To bring it up the surface, we present you StreeLok.
मासिक पाळी या विषयाकडे आपण पराकोटीचं दुर्लक्ष करतो. शिक्षणाचा अभाव आणि समाजात खोलवर रुजलेले गैरसमज यांनी मासिक पाळीला विटाळ ठरवलं. सादर आहे 'स्त्रीलोक', एक मराठी पॉडकास्ट जिथं पाळी आणि आपलं आरोग्य यावर आपण मोकळ्या गप्पा मारु.
Currently playing episode

09 Taking periods 'Sport'ingly | पाळी आणि महिला खेळाडू

StreeLokMar 08, 2023

00:00
23:24
09 Taking periods 'Sport'ingly | पाळी आणि महिला खेळाडू

09 Taking periods 'Sport'ingly | पाळी आणि महिला खेळाडू

Women in sports was a rare thing a decade back. Today, they are excelling in sports. Parents to girls are now actively looking out for the best trainers, keeping track of sports competitions at the national and even at the international level. But how do athlete girls manage their menstrual periods? They usually put their strength to full use in the sport they play. Do periods add another layer of physical and mental stress to their body-mind? In this first anniversary episode of the Streelok podcast, I speak to tennis player Akanksha Nitture's mother Deepa Nitture on how tough it is to keep Akanksha menstrually healthy. She has also shared her observations on Akanksha's tightrope walk.

खेळांच्या क्षेत्रामध्ये मुली दैदीप्यमान कामगिरी करत आहेत. मुलींचे आईवडिलही त्यांना उत्तमोत्तम प्रशिक्षकाकडून ट्रेनिंग मिळावं, विविध स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घ्यावा, नॅशनल आणि इंटरनॅशनल खेळांमध्ये झळकावं याबाबतीत जागरुक आहेत. पण स्पोर्ट्सच्या क्षेत्रात करिअर करणाऱ्या मुलींच्या मासिक पाळीच्या संदर्भात काही विचार झालेला आहे का? त्या दिवसांमध्ये त्यांच्या शारिरीक आणि मानसिक क्षमतांचा वेगळा विचार करण्याची गरज आहे का? या एपिसोडमध्ये लॉन टेनिस प्लेअर आकांक्षा नित्तुरेची आई िदपा नित्तूरे यांच्याशी गप्पा मारल्या आहेत. घरात खेळाडू घडवताना एक आई म्हणून त्या करत असलेले निरिक्षण ऐकण्यासारखे आहे. 


Mar 08, 202323:24
08 I am a proud menstrual cup user

08 I am a proud menstrual cup user

My search for a comfortable, no-nonsense, eco-friendly product with no adverse effect on the skin down there stopped at the menstrual cup. Any woman who discovers its benefits by using it over the course of two to three periods feels the difference in mood and happiness levels. Many even start advocating and promoting it. The cup took the 1A seat in this discussion with these fabulous women.

In Episode 08, I chat with two women in their mid-30s who have been using the menstrual cup during their periods for a considerable amount of time. More than four years for both of them, to be slightly more precise. Listen to them as they narrate the joy of having stress-free periods and the kind of change the cup has brought to the lives of these working women.


मी पाळीच्या दिवसांत मेन्स्ट्रुअल कप वापरायला सुरुवात केली आणि पहिला फ़रक जाणवला तो म्हणजे सॅनिटरी पॅडमुळे सतत सुटणाऱ्या खाजेपासून सुटका झाली. मेन्स्ट्रुअल कपचे बरेच फायदे आहेत. जसे की तो ५ वर्ष वापरता येतो, त्याचे काहीच दुष्परिणाम योनीवर आणि आसपासच्या त्वचेवर होत नाहीत. झोप छान लागते आणि हवे ते कपडे घालता येतात.

ज्या मुली, महिला मेन्स्ट्रुअल कप वापरतात त्या त्याच्या फॅन होतात. मग भेटणाऱ्या प्रत्येक स्त्रीसोबत कप बद्दलची चर्चा करायला लागतात. या एपिसोडमध्ये गेल्या ४ वर्षांपासून मासिक पाळीदरम्यान मेन्स्ट्रुअल कप वापरणाऱ्या प्राजक्ता ढेकळे आणि शीतल प्रदीप ज्योती या दोघींसोबत मी गप्पा मारल्या आहेत. ताणमुक्त आणि सुसह्य पाळीचे दिवस आणलेल्या मेन्स्ट्रुअल कपने त्यांच्या आयुष्यात काय बदल घडवले ते नक्की ऐका.

Dec 22, 202218:58
07 When a 10 year-old girl gets her first period

07 When a 10 year-old girl gets her first period

Like most Indian girls, Afroz Inamdar (33) buried the traumatic experience of first periods deep into her consciousness. But do our memories ever fade away? In this episode, Afroz shares her ordeal of getting her first periods before she was even 10. She said, surprisingly, that sharing this on Streelok relieved her. Listen to her talk about the social norms and misconceptions about menstruation in her community.

आपल्या पहिल्या पाळीचा नकोसा वाटणारा अनुभव प्रत्येक मुलगी विसरून जाण्याचा प्रयत्न करत असते. तसंच अफरोज इनामदार हीनेसुद्धा मनाच्या कोणत्यातरी कोपऱ्यात तो दिवस दाबून टाकला होता. पण या एपिसोडमध्ये अफरोजने वयाच्या १० व्या वर्षी पाळी येण्याचा मानसिक आघात काय होता हे तिने शेअर केलं. ती म्हणते, स्त्रीलोक पॉडकास्टवर हे शेअर केल्याने इतकी वर्ष साचलेल्या त्रासाचा निचरा झाला आणि आकाश मोकळं झालं. मुस्लिम समुदायात असलेले मासिक पाळीविषयीचे समज-गैरसमजही ती यानिमित्ताने सांगते. नक्की ऐका. 

Oct 07, 202219:54
06 Do you talk about periods with your partner?

06 Do you talk about periods with your partner?

For generations, periods have been discussed only among women in the family. Boys, or even men, seldom participate in these chats. In fact, most men closely encounter the phenomenon of periods and issues connected to it only after marriage. In this episode, I spoke to two of my friends, Ram and Kailash, and my husband, Abhishek, about how exactly men feel when their partner is on periods. How and when did they come to know about periods? What was their understanding in childhood, and how did it evolve? 


पाळी आणि पार्टनर

अनेक कुटुंबात मासिक पाळीविषयी बोलताना अनेकदा बायका/मुली हळू आवाजात, घरातल्या पुरुषांच्या/मुलांच्या कानावर पडणार नाही असं बोलतात. पौगंडावस्थेतील मुलांना या चर्चांपासून दूरच ठेवले जाते. अनेक पुरुष हे मासिक पाळी या संकल्पनेविषयी लग्न झाल्यानंतरच परिचित होतात. या एपिसोडमध्ये मी माझे दोन मित्र कैलास वाघमारे, राम भोसले आणि माझा नवरा अभिषेक वाघमारे यांच्याशी गप्पा मारल्या आहेत. पौगंडावस्थेपासून ते आतापर्यंत मासिक पाळीविषयी त्यांच्या समजेत झालेला बदल टिपलाय. बायकोचे पाळीचे दिवस या नवऱ्यांचे कसे असतात हे जाणून घेतलंय. नक्की ऐका. 

Aug 07, 202229:48
05 My menstrual health journey through books

05 My menstrual health journey through books

"When I saw a picture of a vagina in the book, I realised I have a body part which I had never touched and explored. I learned that my vagina has three openings as shown in the picture."

Books that offer sex education in regional languages are few. Thankfully some gynecologists have written several books on this crucial topic in Marathi. In this episode, Reshma Arote, 24 shares her encounter with these books and how she learned about her body through reading.

“जेव्हा मी पुस्तकात योनीचं चित्र पाहिलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की माझ्याच शरिरात एक अवयव असाही आहे ज्याला मी कधीच हात लावला नाहीये. चित्रात दाखवल्याप्रमाणेच माझ्याही योनीला तीन द्वार आहेत हे जाणवल्यावर मला नव्याने माझं शरीर समजत गेलं.”

स्थानिक भाषांमध्ये लैंगिक शिक्षण देणाऱ्या पुस्तकांची संख्या कमी आहे. मराठी भाषेत मात्र अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांनी लैंगिक शिक्षणाची पुस्तकं लिहून वयात येणाऱ्या मुलांच्या मनातल्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. या एपिसोडमध्ये २४ वर्षांची रेश्मा आरोटे तिने वाचलेल्या लैंगिक शिक्षण देणाऱ्या पुस्तकांविषयी सांगतेय. या पुस्तकांनी तिच्यात काय आणि कसा बदल घडवला हे नक्की ऐका.

Jul 07, 202220:59
04: Periods and Disability (Part 2)

04: Periods and Disability (Part 2)

As girls and women, we usually realise that our periods have begun when we actually see blood stains. But what about those who cannot “see”? In this episode, Gauri Deshmukh, a visually impaired student of Pune University, walks us through the struggle and the battle of being able to change pads and maintain hygiene during periods.

Gauri is a part of Divya Jhep, a community of visually impaired students studying in Sir Parshurambhau college in Pune. Yogita Kale, a faculty member at the college who leads the initiative, is mindful of what Gauri goes through. She has seen the trouble her visually impaired students face during periods. Yogita joins us to share how she is designing a workshop for differently abled students to help them manage their menstrual hygiene independently.

आपल्याला जेव्हा रक्ताचे डाग दिसतात तेव्हा पाळी आली असं कळतं पण त्या मुलींना कसं कळतं ज्यांना दिसत नाही? या एपिसोडमध्ये पुणे येथे सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून एम.ए. करणारी गौरी देशमुख ही अंध विद्यार्थीनी आपल्याला तिच्या जगात घेऊन जाते. वयात येत असताना पाळीचा सामना तिने कसा केला आणि आता पॅड बदलणं, स्वच्छता हे सगळं ती कसं करते हे ती मोकळेपणाने सांगते.

गौरी देशमुख स.प. महाविद्यालयाच्या दिव्य झेप या ग्रुपची सदस्य. असिस्टंट टीचर योगिता काळे यांनी काही विद्यार्थ्यांच्या सोबत हा ग्रुप सुरु केला. त्यांनी स्वतः त्यांच्याकडे शिकणाऱ्या अंध मुलींना पाळीदरम्यान येणाऱ्या अडचणी आणि त्यांना करावी लागणारी कसरत पाहिली आहे. त्यातूनच या मुलींसाठी मासिक पाळीच्या बाबतीत स्वयंसिद्ध होण्यासाठी एका कार्यशाळेच्या संकल्पनेवर त्यांनी काम सुरू केलं आहे. या पॉडकास्टमध्ये त्यांनी शेअर केलेले प्रसंग आणि त्या तयार करत असलेल्या कार्यशाळेबद्दल अधिक सविस्तर सांगितलं आहे.

Jun 07, 202223:57
03 Periods and disability (Part 1)

03 Periods and disability (Part 1)

Wheelchair bound Diksha Dinde is a global youth ambassador for education, and has represented India at various fora. She has traveled to Malaysia, South Korea, and Egypt, and has received praise from the Government of India. She faced tons of problems reaching here. One of them, is being physically challenged. Diksha cannot walk. But like every other woman, she gets periods. How challenging is it for her to keep up her menstrual health? In this episode, Diksha walks us through exactly that.

दिक्षा दिंडे, हिने ग्लोबल युथ एम्बेसेडर फॉर एज्युकेशन म्हणून मलेशिया, साऊथ कोरिया, इजिप्त अशा देशांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी एकटीने प्रवास केला. दिक्षा दिव्यांग आहे, व्हिलचेअर ही तिची बेस्ट फ्रेंड आहे. इथपर्यंत पोहोचतानाच्या तिच्या प्रवासात आलेल्या अनेक अडचणींपैकी एक... तिची मासिक पाळी. या एपिसोडमध्ये वयात आल्यानंतरच्या आठवणींचा एकेक पदर उलगडत दिव्यांगत्व आणि पिरेड्स च्या जगात दिक्षा आपल्याला घेऊन जाते.

May 07, 202223:13
02 A gynecologist's take on menstrual health

02 A gynecologist's take on menstrual health

Most women consult a gynecologist only at the time of family planning and pregnancy. Rarely do women visit them for a regular menstrual health check up. In this episode, gynecologist Dr Shilpa Chitnis-Joshi shared some scientific facts about finding reproductive cells in menstrual blood, how to calculate our periods cycle, and why problems related to menstruation have changed over generations, and so much more. Tune in to listen to this fantastic discussion.

कितीतरी कुटुंबातल्या स्त्रिया एकतर गरोदर राहिल्या किंवा कुटुंब नियोजन करायचं असेल तरच स्त्रीरोगतज्ज्ञाकडे जातात. स्वतःच्या पाळीमधल्या बदलांविषयी जागरुक असलेल्या आणि स्त्रीरोगतज्ज्ञाकडे नियमित जाणाऱ्या स्त्रिया संख्येने कमी आहेत. या एपिसोडमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिल्पा चिटणीस जोशी यांनी पाळीच्या रक्तात नवीन पेशींना जन्म देऊ शकणाऱ्या पेशी असल्याचं झालेलं संशोधन, अनियमित आणि नियमित पाळी कशी ओळखावी, पिढी बदलली तसे पाळीचे प्रश्नही कसे बदलले अशा एक ना अनेक भन्नाट वैज्ञानिक गोष्टी आणि किस्से शेअर केले आहेत. महिलांच्या पाळीच्या संदर्भातल्या सर्व बाजूंचा वेध घेणारी ही चर्चा नक्की ऐका.

Apr 08, 202242:12
01 How do you say you are in periods?

01 How do you say you are in periods?

How do you tell you are in periods without saying you are in periods?!

Taboo as the subject is, women have been using code-words to tell they are in their menstrual period for centuries. Women from the coastal Konkan region use the expression, “I’ve got brushed by a crow,” bringing out the widely held linking of a crow to something impure or unholy. Women in cities also sometimes refer to it as “it’s my birthday today!”

In this first episode, I chat with fellow women living in different parts of Maharashtra, my home state, to find out how they refer to the fact that they are in their periods.

Listen in to know the fun words used to describe periods.

“मला पाळी आली आहे” हे न सांगताही तुम्ही कसं सांगता? 

पाळी आल्यावर जवळच्यांना ते सांगण्यासाठी बायका वेगवेगळे कोड वर्ड्स वापरतात. कोकणातल्या मुली-बायका “मला कावळा शिवलाय” असं सांगतात तर शहरातल्या मुली “आज माझा बर्थडे आहे.” असं सांगतात.

या पहिल्या एपिसोडमध्ये मी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत राहणाऱ्या माझ्या मैत्रिणींशी बोलले आहे. पाळी हा शब्द न उच्चारता स्त्रिया आणि मूली पाळी आली आहे सांगण्यासाठी कोणते वेगळे गंमतीशीर शब्द वापरतात ते ऐकूया. 

Mar 08, 202212:34
StreeLok 00 Trailer

StreeLok 00 Trailer

The menstrual cycle is an integral part of women's lives. Yet, there is a lot of ignorance around it, which begins with lack of education. But is education the only factor that will sensitize women, and men, about menstrual health? There are deep-rooted cultural factors--even talking about periods is a taboo--that have kept the fascinating subject out of the public discourse. For the 80 million+ Marathi speakers in the world, we present you StreeLok, a podcast that will bring to you various aspects of women's menstrual health in Marathi. We begin this International Women's Day! See you every month. 

मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग आहे. तरीही या विषयाकडे आपण पराकोटीचं दुर्लक्ष करतो. मासिक पाळीविषयी न मिळालेल्या शिक्षणापासून याची सुरूवात होते. पण हे एकमेव कारण नाही. समाजात खोलवर रुजलेल्या गैरसमजांमुळे मासिक पाळीला विटाळ ठरवलं गेलं आणि त्याबद्दल बोलायची चोरी झाली. जगभरात असलेल्या 8 कोटींपेक्षा जास्त मराठी लोकांसाठी सादर आहे 'स्त्रीलोक', एक पॉडकास्ट जिथं मासिक पाळी आणि आरोग्य यांच्याविषयी मराठीतून चर्चा केली जाणार आहे. यंदाच्या 8 मार्च 2022 या जागतिक महिला दिनी याची सुरूवात करत आहे. भेटुयात दर महिन्याच्या ८ तारखेला‍!

Mar 02, 202200:47