Skip to main content
Marathi blog

Marathi blog

By Machhindra Mali

'आनंद पथ'

*घर बांधिले डोंगरी--!!*

जीवनात आनंदप्राप्ती मधील मुख्य अडसर- तीव्र स्वरूपाच्या विषय उपभोगाची इच्छा! त्या साधत नाहीत, परिणामतः मन स्वच्छ, निष्काम होणे असाध्य होते. अहंकार फणा उभारतो व माणूस देखाव्यासाठी अनेक हास्यास्पद कृती करत असतो.
मुक्ताईने ताटीच्या अभंगात या प्रकाराचे नेटके वर्णन केले आहे.

घर बांधिले डोंगरी।विषया हिंडे दारोदारी।।
काय केला योग धर्म।नाही अंतरी निष्काम।।
गंगाजळ हृदय करा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा।।

संवाद ज्ञानिया दादाशी असला तरी रोख समाजमनावर आहे,
हृदय गंगाजळाप्रमाणे पवित्र हवे, निष्कपट वासनारहित हवे. नाहीतर डोंगरदऱ्यात राहून काय फायदा? ही प्रपंचाची आसक्ती सुख द